ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी
By Admin | Updated: August 2, 2016 01:59 IST2016-08-02T01:58:07+5:302016-08-02T01:59:10+5:30
चौधरी : ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी

ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी
नाशिक : भाजपाने नव्याने गठीत केलेल्या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील ओबीसींचे प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि इतर मागासवर्गाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात सोमवारी (दि. १) ओबीसी मोर्चाची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. याप्रसंगी ओबीसी मोर्चाच्या शहर कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणीत शहराध्यक्षपदाची धुरा विश्वजित शहाणे यांच्याकडे सोपविण्यात आली असून, उपाध्यक्षपदी आनंद शेलार, मोहन सुतार, राहुल तिडके, चेतन घुगे, महेश थोरात, आनंद शेलार, पंकज सोनवणे, मदन पाटील, अजिंक्य बोडके यांची वर्णी लागली आहे. सरचिटणीसपदी नीलेश उदावंत, विजय काठे व सुशील आष्टेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हाध्यक्षपदी भानुदास घुगे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. (प्रतिनिधी)