‘वसाका’चे स्वतंत्र लेखापरीक्षण

By Admin | Updated: May 5, 2016 22:36 IST2016-05-05T22:33:30+5:302016-05-05T22:36:33+5:30

सहनिबंधकांचे आदेश : तत्कालीन २२ संचालकांचे धाबे दणाणले

Independent Audit of 'Vasaka' | ‘वसाका’चे स्वतंत्र लेखापरीक्षण

‘वसाका’चे स्वतंत्र लेखापरीक्षण

कळवण : कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे सन २००७ ते २०१५ या आर्थिक वर्षातील सर्व कामकाजाचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याचे आदेश पुणे येथील सहकार विभागाचे सहनिबंधक (लेखापरीक्षण) यांनी दिलेल्या आदेशामुळे तत्कालीन संचालक मंडळाचे धाबे दणाणले आहेत.
सन २००७ ते २०१५ या काळातील स्वतंत्र लेखापरीक्षण करून त्यात अनियमतिता आढळल्यास व गैरव्यवहार झाले असल्यास त्या काळातील २२ संचालक व ३ कार्यकारी संचालकांवर व्यक्तीश: जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांकडे करून योग्य कार्यवाही करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यानुसार साखर आयुक्त, सहकार आयुक्त व सहकार विभागातर्फे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत.
कारखान्यातील घटनात्मक पेच सुटावा यासाठी उर्वरित संचालक मंडळ बरखास्त करण्यात आमचा पाठपुरावा सुरू होता. बरखास्तीनंतर शासकीय प्रशासकांनी प्रयत्न करण्याऐवजी कारखाना मालमत्ता जप्तीत मोठी भूमिका पार पाडली. सन २०१६चा गळीत हंगाम तुटपुंज्या कर्जातून होण्यापेक्षा शासन पॅकेजमधून होणे आवश्यक होते. परंतु वित्तीय शासन हमी प्राधिकृत अधिकारी या गोंडस वातावरणात कारखान्याने कमावले व काय गमावले हे सभासद व कार्यक्षेत्रासमोर येणे आवश्यक असल्याचे सुनील देवरे यांनी सांगितले. कामगार पूर्ण क्षमतेने काम करण्याची ग्वाही देत असताना आपली कार्यक्षमता लपविण्यासाठी व्यवस्थापनाने यापूर्वी कामगार कपातीसारखे बेकायदेशीर प्रयोग केल्याचा आरोप सुनील देवरे व गोविंद पगार यांनी केला आहे.

Web Title: Independent Audit of 'Vasaka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.