सातपूर परिसरात स्वातंत्रदिन उत्साहात
By Admin | Updated: August 18, 2015 00:05 IST2015-08-17T23:57:02+5:302015-08-18T00:05:09+5:30
सातपूर परिसरात स्वातंत्रदिन उत्साहात

सातपूर परिसरात स्वातंत्रदिन उत्साहात
सातपूर : परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, शासकीय, निमशासकीय संस्थांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी विद्यालय
सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती विद्यालयात सभागृहनेते सलीम शेख, प्रभाग सभापती उषा शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गणेश बोलकर, जगन पवार, अशोक नारखेडे, लोकेश गवळी आदि उपस्थित होते. प्रारंभी स्काउटच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. विद्यार्थ्यांनी ‘बलसागर भारत होवो’ हे गीत सादर केले. स्वागत मुख्याध्यापक जयश्री पाटील यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुलोचना गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन अलका दरोडे यांनी केले. निर्मला लोखंडे यांनी आभार मानले. यावेळी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयातील १९९५ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.
मनपा शाळा क्र. २१
संतोषीमातानगर येथील मनपा शाळा क्र. २१ मध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रेखा उन्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चावडी वाचन करण्यात आले. प्रारंभी परिसरातून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी केले. सारिका लिटे यांनी प्राथमिक केले. सुनंदा सोनार यांनी आभार मानले.
जिजामाता शाळा
सातपूर कॉलनीतील महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळा क्र. ८, शाळा क्र. ९५, शाळा क्र. ९६ या जिजामाता शाळेत सभागृह नेते सलीम शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग सभापती उषा शेळके, तसेच बाबासाहेब अहिरे, प्रतिभा सिसोदिया, बी. सी. शिरसाठ, चंद्रकला बोरसे, सिद्धेश्वर सोनार, रिता दुबे आदि उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक कैलास ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक नितीन देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले यांनी केले. आशा भोये यांनी आभार मानले. प्रारंभी विद्यार्थ्यांची परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
स्प्रिंगफिल्ड अकॅडमी
विश्वासनगर येथील स्प्रिंगफिल्ड अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर दशरथ पाटील, तसेच विक्रम नागरे, संस्थेचे सचिव डॉ. शीतल पवार, समन्वयक डॉ. साधना पवार, डॉ. सुभाष सोनवणे, सुरेश पवार आदि उपस्थित होते. विद्यार्थ्यांची परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली. देशभक्तिपर गीतांसह विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक डॉ. शीतल पवार यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक ज्योती दीक्षित यांनी केले. सूत्रसंचालन ऋतिका शहा व हर्षाली पवार यांनी केले. प्रियंका शिरसाठ यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातपूर सोसायटी
सातपूर गावातील विविध कार्यकारी सोसायटीत सभापती चंद्रकांत विधाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपसभापती विजय भंदुरे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माधव तिडके, गणेश मौले, सुनील सोनवणे, शिवाजी भंदुरे, चंद्रभागा विधाते, किशोर मुंदडा, छगन भंदुरे, दशरथ चव्हाण आदि संचालकांसह बाळासाहेब बंदावणे, चंद्रकांत निर्वाण, गुजराथी आदिंसह सभासद उपस्थित होते.
मनपा विभागीय कार्यालय
महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयात विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपअभियंता रमेश पाटोळे, अशोक मेश्राम, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, ए. ए. खान, राजेंद्र सोनवणे, अशोक उशिरे, मोगल आदिंसह संबंधित खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.