नांदगाव तालुक्यात स्वातंत्र्यदिन; शहीद स्मारकाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 10:49 PM2020-08-16T22:49:58+5:302020-08-17T00:19:12+5:30

नांदगाव : येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे सभासद वाल्मीक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Independence Day in Nandgaon taluka; Inauguration of Martyrs' Memorial | नांदगाव तालुक्यात स्वातंत्र्यदिन; शहीद स्मारकाचे उद्घाटन

मालेगाव : येथील दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मेडीयम स्कुल येथे संस्थेचे अध्यक्ष देविदास बच्छाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्य गणेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शिक्षक निखिल बोरसे यांनी केले. आभार हरीश बच्छाव यांनी मानले. कार्यक्रमास कमल बच्छाव, सचिन बच्छाव, पुनम बच्छाव, केतन सुर्यवंशी प्रमुख पाहुणे होते.

googlenewsNext
ठळक मुद्देनांदगाव येथील हुतात्मा चौकात नूतनीकरण

नांदगाव : येथील मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे सभासद वाल्मीक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. आय. पटेल, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सर्जेराव पाटील, उपप्राचार्य प्रा. संजय मराठे, कनिष्ठ विभागाचे प्रमुख प्रा. रविंद्र देवरे, प्रा.सुरेश नारायणे उपस्थित होते. प्रा.सागर कडलग यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पल्लवी गुढेकर, नैना पगारे, रूपाली भालेकर, दर्शना चोपडा, रितीका मोरे, संस्कृती तोरणे आदी उपस्थित होते.
हुतात्मा चौक, नांदगाव
वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नूतनीकरण केलेल्या हुतात्मा स्मारकाचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन आमदार सुहास कांदे, वीरपिता मारु ती ढोकरे, वीरपत्नी शीतल मल्हारी लहिरे, वीरपिता प्रल्हाद पगार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र धामणे यांच्या संकल्पनेतून शहरात हुतात्मा स्मारक उभारले होते; परंतु काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने स्मारक पडले होते. त्यामुळे स्मारकाची दुरु स्ती करण्याची मागणी तालुक्यातील विविध संघटनानी केली होती. आमदार सुहास कांदे यांनी स्वखर्चाने हुतात्मा स्मारकाचे काम पूर्ण केले. शहीद संजय मारु ती ढोकरे यांचे वडील मारु ती ढोकरे, शहीद शरद प्रल्हाद पगार यांचे वडील प्रल्हाद पगार, शहीद मल्हारी लहिरे यांच्या पत्नी शीतल लहिरे यांच्या हस्ते स्मारकाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नांदगाव ग्रामीण रु ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे यांना कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बापूसाहेब कवडे, तहसीलदार उदय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, नगराध्यक्ष राजेश कवडे, पंचायत समिती सभापती भाऊसाहेब हिरे, विलास आहेर, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, शहरप्रमुख सुनील जाधव, प्रमोद भाबड, सागर हिरे, सुमित सोनवणे, सुमित गुप्ता आदी उपस्थित होते.आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा, न्यायडोंगरीस्व. गंगाधर शिवराम आहेर अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत श्रीरंग कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आश्रमशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागल्याबद्दल मुख्याध्यापक पी. बी. गावित यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद नाशिक व वुमन्स अ‍ॅण्ड चाईल्ड डेव्हलपमेंट ट्रस्ट आयोजित व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणांतर्गत ब्यूटिपार्लर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींचा सुनीता आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शालेय प्रांगणात पंडित साळुंखे, पप्पूशेठ नहार, सदाशिव सरगर, ताराचंद मोरे, चांगदेव चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. माजी आमदार अनिल आहेर यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

Web Title: Independence Day in Nandgaon taluka; Inauguration of Martyrs' Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.