सिन्नर तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:48+5:302021-08-17T04:20:48+5:30
तहसील कार्यालय, सिन्नर सिन्नर तहसील कार्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. प्रांताधिकारी पूजा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

सिन्नर तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात
तहसील कार्यालय, सिन्नर
सिन्नर तहसील कार्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. प्रांताधिकारी पूजा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह विविध शासकीय खात्याचे अधिकारी, नगरसेवक, विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नगर परिषद
येथे नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी संजय केदार, गटनेते हेमंत वाजे, नामदेव लोंढे यांच्यासह सर्व नगरसेवक व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सिन्नर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्या हस्ते, हुतात्मा स्मारकात उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, पंचायत समितीत पंचायत समितीच्या सभापती रोहिणी कांगणे, बाजार समितीत सभापती लक्ष्मणराव शेळके, तर वाचनालयात अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नगर परिषद कार्यालयात स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सिन्नर महाविद्यालय, विविध शाळा व महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लोकनेते वाजे विद्यालय
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वाजे विद्यालयात स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा मविप्रचे माजी संचालक कृष्णाजी भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
स्काऊट-गाइडचे ध्वजारोहण मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक हेमंत वाजे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मंचावर स्कूल कमिटी सदस्य मान्यवर भाऊसाहेब गोजरे, डॉ. विजय लोहरकर, शालिनी देशमुख, इंदुमती कोकाटे, प्रसाद हांडोरे, अर्जुन गोजरे, शिवाजी देशमुख, मनीष गुजराथी, चंद्रभान दातीर, मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ, के. आर. रहाणे, पी. डी. जाधव, मुख्याध्यापक संगीता आव्हाड आदी उपस्थित होते.
डुबेरे जनता विद्यालय
तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट-गाइडचे ध्वजारोहण प्राचार्य किशोर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सिन्नरच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष मथुराबाई वाजे यांचा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिनिधिक स्वरूपात कोरोनायोद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर सरपंच अर्जुन वाजे, उपसरपंच नंदा पवार आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
तलाठी कार्यालय, ठाणगाव
ठाणगाव : येथील तलाठी कार्यालयात सैन्य दलातील जवान स्वप्निल काकड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी कामगार तलाठी वाय. आर. गावीत, त्र्यंबक गुरुकुले, गणेश लांडगे, दिलीप शिंदे, सुहास आव्हाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तलाठी गावीत यांनी ई-पीक पहाणीसंदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
जि. प. शाळा, ठाणगाव
ठाणगाव : तालुक्यातील ठाणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गावातील सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक महेश गायकवाड, संजय पगार, सोनाली सोनवणे यांच्यासह शालेय समितीचे सदस्य उपस्थित होते.
ठाणगाव ग्रामपंचायत
ठाणगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात सदस्य शोभा शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच सीमा शिंदे, शेखर कर्डिले, डी. बी. भोसले, सुरेश शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी गावातील सर्व सैनिकांनी गणवेशासह झेंड्यास मानवंदना दिली.
भोर विद्यालय, ठाणगाव
ठाणगाव : येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब कनिष्ठ महाविद्यालयात स्कूल कमिटीचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी अरुण केदार, राजेंद्र भावसार, डी. एम. आव्हाड, बबन काकड, ज्ञानेश्वर शिरसाठ, सचिन रायजादे, मुख्याध्यापक एस. एस. सालके, ए. बी. कचरे, एस. बी. ठुबे, पी. बी. थोरात, आर. सी. काकड आदी उपस्थित होते. जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने विद्यालय परिसरात वृक्षरोपण करण्यात आले.
वावी येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
वावी : येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच कन्हैयालाल भुतडा, प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य मीना मंडलिक, पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रेमलता जाजू यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना योद्ध्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
(१६ सिन्नर वावी)
वावी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त कोरोनायोद्ध्यांचा सत्कारप्रसंगी कन्हैयालाल भुतडा, विजय काटे, मीना काटे, प्रशांत कर्पे, संदीप राजेभोसले, रामराव ताजणे, प्रेमलता जाजू, मीना मंडलिक, साधना घेगडमल व ग्रामस्थ.