निफाड शहर व परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST2021-08-19T04:19:27+5:302021-08-19T04:19:27+5:30
निफाड नगरपंचायत येथे नगरपंचायतीच्या प्रशासक तथा प्रांत डॉ. अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नगरपंचायतीच्या वतीने ...

निफाड शहर व परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात
निफाड नगरपंचायत येथे नगरपंचायतीच्या प्रशासक तथा प्रांत डॉ. अर्चना पठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ पार पडला. याप्रसंगी मुख्याधिकारी श्रीया देवचके, नगर अभियंता भालचंद्र क्षीरसागर आदींसह नगरसेवक, नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
वैनतेय विद्यालय
वैनतेय विद्यालयात न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे सचिव रतन पाटील वडघुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त राजेंद्र राठी, मधुकर राऊत, विश्वास कराड, विद्यालयाचे प्राचार्य एस.पी.गोरवे, उपप्राचार्य बी. आर.सोनवणे, पर्यवेक्षक एम. एस. माळी, पर्यवेक्षक एन.डी. शिरसाट, वैनतेय ज्युनिअर कॉलेजचे ऑफ सायन्सचे विभागप्रमुख प्रा. राजेंद्र सूर्यवंशी, वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य देवेंद्र सांबरे, पर्यवेक्षक पल्लवी सानप , वैनतेय प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे,वैनतेय शिशुविहार मंदिराच्या मुख्याध्यापिका प्रसन्ना कुलकर्णी आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने बघितला.
सोनी विद्यालय
मातोश्री जसोदाबाई सोनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत संस्थेचे खजिनदार सादिक शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार,संस्थेचे विश्वस्त शशांक सोनी,चंद्रभान गीते, कमलाकर कहाणे ,मुख्याध्यापक ज्ञानदेव ढोमसे, मुख्याध्यापक नितीन कडलग व कर्मचारी उपस्थित होते, निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. निफाड पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
माणकेश्वर वाचनालय
श्री माणकेश्वर वाचनालयात वाचनालयाचे अध्यक्ष मधुकर शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी वाचनालयाचे चिटणीस बाळासाहेब कापसे, हिशोब तपासणीस दत्ता उगावकर,सरचिटणीस तनविर राजे , सुहास सुरळीकर, सुनील सोनवणे, ,सुजाता तनपुरे, ग्रंथपाल बाळासाहेब खालकर, नितीन बनसोडे, आदी उपस्थित होते. येथील जि. प. शाळा निफाड नं. १ या शाळेत निफाडचे गटशिक्षणाधिकारी के. व्ही.तुंगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक निलेश शिंदे,नगरसेवक अनिल कुंदे, भारती कापसे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप कापसे व शिक्षक,पालक उपस्थित होते. निफाड पंचायत समिती येथे पं. स .च्या सभापती सुलभा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी उपसभापती गयाबाई सुपनर तसेच पं.स सदस्य , अधिकारी उपस्थित होते
180821\18nsk_28_18082021_13.jpg
फोटो - १८ निफाड इंडिपेन्डन्स