अजमीर सौंदाणे येथे स्वातंत्र्यदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:51 IST2020-08-17T17:49:26+5:302020-08-17T17:51:20+5:30
औंदाणे: बागलाण तालुक्यात अजमीर सौंदाणे येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच धनंजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

अजमीर सौंदाणे येथे स्वातंत्र्यदिन साजरा
औंदाणे: बागलाण तालुक्यात अजमीर सौंदाणे येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच धनंजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्वच्छतेचे महत्त्व, पाणी जपून वापरण्यासंबधी मार्गदर्शन व कोरोनापासून सुरिक्षत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर जि. प शाळेत ध्वजारोहण उपसरपंच भूषण पवार व जनता विद्यालयाचे ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक श्यामसिंग पवार यांनी केले. यानंतर व्यायाम शाळेचे उद्घाटन करून वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सदस्य रविंद्र पाटोळे, वंदना मोरे, दिपक शेवाळे, कांती मोरे, वंदना माळी, सपना नंदाळे, दिपाली मगर ,मनिषा माळी, बाळू पवार आदी उपस्थित होते.