मालेगाव, : माता-बाल संगोपनाचा शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. त्याअंतर्गत गर्भवती माता, तसेच ३० दिवसांपर्यंतच्या मुलांवर मोफत उपचारांची सुविधा आहे. अर्भकांवरील उपचारात मुदतीपूर्व जन्म झालेल्या बालकांवर उपचार अत्यंत अवघड असतो. अशा मुलांना काचेच्या पेटीत ठेवावे लागते. खासगी रुग्णालयामध्ये या उपचारांसाठी दिवसाला हजारो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा विचार करून सामान्य रुग्णालयातील इन्क्युबेटर (काचपेटी) नवजात बालकांना नक्कीच उपयोगी पडतील, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
मालेगाव सामान्य रुग्णालयास शासनाकडून प्राप्त झालेल्या विविध आरोग्य सुविधांच्या साहित्याचे लोकार्पण भुसे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, सखाराम घोडके, जी. पी. बच्छाव, प्रमोद शुक्ला, संजय दुसाणे, रामा मिस्तरी, राजेश गंगावणे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हितेश महाले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. योगेश पाटील, डॉ. शिलवंत, डॉ. राजेंद्र शिरसाठ, डॉ. पुष्कर आहेर, डॉ. सुमेध भामरे, डॉ. ओम जाधव, डॉ. आशिष अजमेरा, डॉ. वीरेंद्र पाटील, अधिसेविका रेखा माळी, बेधमुथा, स्वाती जाधव यांच्यासह सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम मंत्री भुसे यांच्या हस्ते लहान मुलांच्या ६ वॉरमर, दोन फोटो थेरपी युनिट व १० लहान मुलांचे व्हेंटिलेटरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री भुसे म्हणाले, २०० खाटांची क्षमता सामान्य रुग्णालयात उपलब्ध असून, भविष्यातील गरज लक्षात घेता कॅम्प भागातही लवकरच १०० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भुसे म्हणाले, सामान्य रुग्णालयाची गरज लक्षात घेता या इमारतीचे अजून दोन मजले वाढवून खाटांच्या क्षमतावाढीसाठी प्रयत्न केले जातील असेही भुसे म्हणाले.
----------------
सामान्य रुग्णालयात लहान बालकांसाठी काचपेटीचे लोकार्पण करताना कृषिमंत्री दादा भुसे समवेत महापौर ताहेरा शेख, डॉ. हितेश महाले, डॉ. शिलवंत आदी उपस्थित होते. (२४ मालेगाव भुसे)
240921\24nsk_28_24092021_13.jpg
२४ मालेगाव भुसे