दर वाढविल्याने आर्थिक भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:23+5:302021-07-07T04:17:23+5:30
इच्छुकांचा जनसंपर्कावर भर नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भाने अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. जनसंपर्क वाढविण्याबरोबरच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन ...

दर वाढविल्याने आर्थिक भुर्दंड
इच्छुकांचा जनसंपर्कावर भर
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भाने अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. जनसंपर्क वाढविण्याबरोबरच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी समाजमाध्यमांचा वापर करून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विद्युत खांबांवर वेलींचे जाळे
नाशिक : शहरातील विविध भागांतील विद्युत पोलवर वेली वाढल्याने पावसाळ्यात हे खांब धोकादायक झाले आहेत. वीज वितरण कंपनीने या वेली काढाव्यात अशी मागणी वारंवार केली जात असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
लस मिळत नसल्याने नाराजी
नाशिक : शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक नागरिक सकाळपासूनच लसीकरण केंद्रांवर रांगा लावतात. मात्र, लस उपलब्ध न झाल्याने त्यांना पुन्हा माघारी फिरावे लागते.
वाहतुकीस अडथळा
नाशिक : शहरातील जीपीओ रोडवर खोदलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम असून, यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरील काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर
नाशिक : दोन दिवसांपूर्वी घनकर लेनमध्ये पडलेल्या जुन्या वाड्यामुळे शहरातील जुन्या वाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत महापालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.