वणीसह दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 10:30 PM2020-08-08T22:30:13+5:302020-08-09T00:16:28+5:30

वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असून, प्रशासनाची चिंता वाढली आहे. परिणामी नागरिक भयभीत झाले आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांनाही स्वॅब तपासणी व कॉरण्टाइनला सामोरे जावे लागत असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीची कसोटी लागली आहे. त्यात दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून परिचित वणीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Increasing influence of corona in Dindori taluka including Wani | वणीसह दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव

वणीसह दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीची कसोटी लागली आहे.

वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असून, प्रशासनाची चिंता वाढली आहे. परिणामी नागरिक भयभीत झाले आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांनाही स्वॅब तपासणी व कॉरण्टाइनला सामोरे जावे लागत असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीची कसोटी लागली आहे. त्यात दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून परिचित वणीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
एका भागातील बाधितांचा अहवाल निगेटिव्ह आला की दुसऱ्या भागात बाधित रुग्ण आढळून येत आहेत. बाधित रुग्ण अहवाल निगेटिव्ह आला रे आला की त्या भागातील नागरिक आरोग्य विभागाचे आरोग्यसेवक यांच्या समन्वयात्मक सहभागातून रांगोळ्या काढणे, पुष्पवृष्टी करणे, स्वागत करणे अशा सकारात्मक व प्रेरणादायक भावनेतून केले गेलेले आयोजन निगेटिव्ह अहवाल आलेल्यांचा आत्मविश्वास वाढविणारा आहे. पुष्पवृष्टीची फुले सुकण्यापूर्वी व त्यातील सुगंध दरवळण्यापूर्वीच दुसºया भागात बाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागाचे कौतुक करावे की, कर्तव्यपरायणतेची कसोटी घ्यावी, असा प्रश्न आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे पडला आहे.
दरम्यान, वणीत वृद्ध व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा आरोग्य विभागाची जबाबदारी वाढली आहे. परिसर निर्जंतुकीकरण करणे, क्षेत्र प्रतिबंधित करणे, संपर्कातील व्यक्ती कॉरण्टाइन करणे, नेहमीप्रमाणे या बाबींची पूर्तता क्रमप्राप्त असली तरी आरोग्य विभागाच्या सूचना गांभीर्याने न घेता त्याकडे बघण्याचा उदासीन दृष्टिकोन हा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत होऊ शकतो याचीही दखल घेण्याबाबत सूर उमटतो आहे. वणीत वृद्ध व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा आरोग्य विभागाची जबाबदारी वाढली आहे. परिसर निर्जंतुकीकरण करणे, क्षेत्र प्रतिबंधित करणे, संपर्कातील व्यक्ती कॉरण्टाइन करणे, नेहमीप्रमाणे या बाबींची पूर्तता क्रमप्राप्त असली तरी आरोग्य विभागाच्या सूचना गांभीर्याने

Web Title: Increasing influence of corona in Dindori taluka including Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.