शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचा वाढला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:49 IST

नाशिक : सततच्या पावसामुळे दक्षिण भारतात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महाराष्टÑातील कांद्याला मागणी वाढली असून, मागील दहा ते १५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याला २५५६ रुपये सर्वाधिक, तर सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. डिसेंबरपर्यंत कांदा दराची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे दक्षिणेतील राज्यात नुकसान : नवीन पीक येईपर्यंत स्थिती कायम राहाणार

संजय दुनबळे।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सततच्या पावसामुळे दक्षिण भारतात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महाराष्टÑातील कांद्याला मागणी वाढली असून, मागील दहा ते १५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याला २५५६ रुपये सर्वाधिक, तर सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. डिसेंबरपर्यंत कांदा दराची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.मागील काही दिवसांपासून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दक्षिण भारतात सुमारे ४२ टक्के कांदा पिकाचे नुकसान झाले असून, तेथून होणारी आवक कमी झाली आहे. याशिवाय यावर्षी कांदा सडण्याचे प्रमाणही वाढले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवणूक केली आहे तोही आता सडू लागला आहे.पोळ कांद्याची ज्या प्रमाणात लागवड होणे अपेक्षित होते त्या प्रमाणात झालेली नाही. महाराष्टÑात कांदा साठवणुकीची परंपरा असल्यामुळे सध्या महाराष्टÑातील शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा शिल्लक आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे कांद्याचे दर वाढले असून, यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांदा दराची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोना नसता तर कांद्याचे दर किमान तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले असते, मात्र कोरोनामुळे दर काहीसे कमी आहेत. महाराष्टÑ आणि मध्य प्रदेशातील दोन ते तीन जिल्ह्यांमध्येच कांदा साठवणुकीची परंपरा असल्याने सध्या येथील शेतकºयांकडेच कांदा उपलब्ध आहे. नवीन माल येण्यासाठी किमान पाच ते साडेपाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेडपावसामुळे आंध्र, कर्नाटकमधील मालाचे नुकसान झाले आहे. याशिवाय आपल्याकडेही लागवडीवर परिणाम झाला आहे. यामुळे कांदा दरात वाढ झाली आहे. परतीचा पाऊस पडला तर कांदा दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.- ओमप्रकाश राका,निर्यातदार, लासलगावपंधरा दिवसांपासून कांद्याचे दर वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. अर्ली लाल कांदा संपल्यामुळे दरवाढ झाली आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे यावर्षी व्यापाºयांकडेही कांद्याचा साठा नाही. जो काही कांदा आहे तो शेतकºयांकडेच उपलब्ध असल्याने दरवाढीचा शेतकºयांना थेट फायदा होणार आहे.- मनोज जैन, कांदा व्यापारी, लासलगाव

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा