त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वाढोली येथे आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या जलधारांमुळे गळती होत आहे. परिणामी येथे आलेल्या रु ग्णांची गैरसोय होत आहे.येथील आरोग्य उपकेंद्रात अनेक रु ग्ण त्यात वृध्द महिला, गरोदर महिला, लहान मुले आदीं उपचारार्थ दाखल झाले आहेत. संपुर्ण उपकेंद्रात सगळीकडे पाणीच पाणी असल्याने रु ग्णांवर उपचार करताना, तसेच त्यांच्या नातलगांना त्रास सहन करावा लागत आहे. पाहताही येत नाही.उपकेंद्राची इमारत होऊन, औषधे, गोळ्या आदींचा स्टॉक असतांनाही रु ग्णांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपकेंद्र दुरु स्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत पाठवुन देखील निधी प्राप्त होत नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहे.वाढोली येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत होऊन पंधरा वर्षा पुर्वी बसवलेले पत्रे जीर्ण झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने उपकेंद्रात पावसाचे पाणी येत आहे. उपकेंद्राची सोय नसुन गैरसोयीचे झाले आहे. त्यामुळे येथील आरोग्य सेविका व कर्मचारी यांना रु ग्णांवर उपचार कसा करावा हा प्रश्न निर्माण होत आहे. तर गावात मोठ्या प्रमाणात सर्दी, खोकला, तापाचे रु ग्ण आहेत. त्यांना खाजगी रु ग्णालयात उपचार घ्यावे लागतात. शासनाने ठेकेदारांना लाखो रु पयांचे उपकेंद्रांचे काम देउन वास्तु बांधली. आता ही वास्तू बिनकामाची होऊ पाहते आहे. उपकेंद्र दुरु स्तीची मागणी यापूर्वी येथील कर्मचारी परिचारिका यांच्याकडून वारंवार करण्यात आली, पण याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.चौकट :दुरु स्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत धुळ खातगत चार महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुरूस्ती योग्य आरोग्य उपकेद्राचा अहवाल सुट्टीच्या दिवशी कर्मचारी व आरोग्य अधिकारी यांना पंचायत समितीमध्ये बसुन मागाहून घेतला. त्यात वाढोली येथील उपकेद्राची दुरूस्ती करण्याचा अहवाल सादर केला असतांना कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध होऊ न शकल्याने गावातील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आला आहे.प्रतिक्र ीयाआरोग्य उपकेंद्र दुरुस्तीसाठी अहवाल पाठवा आहे. उपकेद्रात पत्रे फुटले असल्याने पाणी आत येते, त्यामुळे रूग्णांना उपचार देतांना अडचणी होत आहे. त्यासाठी त्वरीत पत्रे बदलणे आवश्यक आहे.- किशोर अहिरे, आरोग्य कर्मचारी.
वाढोली आरोग्य उपकेंद्राची दैनावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:22 IST
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वाढोली येथे आरोग्य उपकेंद्रात पावसाच्या जलधारांमुळे गळती होत आहे. परिणामी येथे आलेल्या रु ग्णांची गैरसोय होत आहे.
वाढोली आरोग्य उपकेंद्राची दैनावस्था
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : तालुक्यातील उपकेन्द्राच्या इमारतीला पावसाची गळती