मालेगावात फुलांच्या मागणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:39 IST2020-12-11T04:39:31+5:302020-12-11T04:39:31+5:30
----- सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याची मागणी मालेगाव : शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. काही शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत. ...

मालेगावात फुलांच्या मागणीत वाढ
-----
सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याची मागणी
मालेगाव : शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. काही शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत. कडीकोंडा नसल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. महापालिकेने सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
----
क्रीडा संकुलाजवळील रस्ता दुरुस्तीची मागणी
मालेगाव : शहरातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाजवळील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनेदेखील केली होती; मात्र महापालिका प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे आश्वासन देऊनही रस्ता दुरुस्त केला नाही. नागरिकांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे.
-----
सायकल बाजारातील उलाढाल वाढली!
मालेगाव : सध्या हिवाळा सुरू असल्याने व्यायामासाठी नागरिक सायकलींगला पसंती देत आहेत. सायकलस्वारांचे ग्रुप तयार करून सकाळच्या सत्रात शहरातील प्रमुख रस्त्यांवर सायकली दिसत आहेत. परिणामी, सायकल बाजारात सायकल विक्री वाढली आहे.
-----
सटाणानाका भागात पोलीस चौकीची मागणी
मालेगाव : शहरातील सटाणानाका भागात पोलीस चौकी कागदोपत्री कार्यरत आहे; मात्र पाेलीस चौकीत अधिकारी व कर्मचारी राहत नाहीत. या भागात मोठ्या प्रमाणात बँका, खासगी कार्यालये, रुग्णालये, मोठमोठी आस्थापने आहेत. ही चौकी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
-----
वृक्ष संवर्धन मोहीम राबविण्याची मागणी
मालेगाव : शहरात सामाजिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे; मात्र या वृक्षांची कत्तल व नासधूस केली जात आहे. महापालिका वृक्ष चळवळीबाबत उदासीन आहे. सामाजिक संस्थांनी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करावे, अशी मागणी केली जात आहे.
-----
बंद पथदीप सुरू करण्याची मागणी
मालेगाव : शहरातील काही भागांमध्ये पथदीप बंद पडले आहेत. नादुरुस्त पथदीपांची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे. यामुळे रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य दिसून येते. महापालिकेच्या विद्युत विभागाने पथदीपांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
-----
उद्यानाची साफसफाईची मागणी
मालेगाव : सोयगाव भागातील राजमाता जिजाऊ उद्यानात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच कारंजा परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. या उद्यानातील खेळणीची साफसफाई करून उद्यानात साचलेले दूषित पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी केली जात आहे.