पर्यटकांची वाढली गर्दी

By Admin | Updated: November 16, 2015 21:27 IST2015-11-16T21:25:43+5:302015-11-16T21:27:47+5:30

पर्यटकांची वाढली गर्दी

Increased crowd of tourists | पर्यटकांची वाढली गर्दी

पर्यटकांची वाढली गर्दी

पंचवटी : लक्ष्मीपूजन, भाऊबीज सणानिमित्ताने शाळा, महाविद्यालये, खासगी नोकदारांना सुट्या असल्याने शेकडोंच्या संख्येने परराज्यातील भाविक देवदर्शनासाठी पंचवटीत दाखल झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे पंचवटी परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे.
दीपावलीच्या सुटीत दरवर्षीच शेकडो भाविक पंचवटीत देवदर्शनासाठी धार्मिक स्थळांना भेट देतात. सुटी असल्याने सध्या भाविक रामकुंड, तपोवन, श्री काळाराम मंदिर, सीतागुंफा, नारोशंकर मंदिर, श्री कपालेश्वर महादेव मंदिर, तसेच भक्तिधाम येथे भेट देत असल्याने परिसर भाविकांच्या गर्दीने भरगच्च होत आहे. भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने भाविकांच्या वाहनामुळे रामकुंडालगत तसेच म्हसोबा महाराज पटांगण येथे असलेले मनपा वाहनतळ भरगच्च होत आहे, तर सकाळ-सायंकाळ रस्त्यावर वर्दळ वाढल्याने परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून जात आहे.
देवदर्शनासाठी येणारे भाविक मुक्कामी थांबत असल्याने परिसरातील छोटे-मोठे हॉटेल्स तसेच धर्मशाळा सकाळच्या वेळी गर्दीने फुलून जात आहे. याशिवाय भाविक गंगाघाट परिसरात विविध वस्तू खरेदी करीत असल्याने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे व्यवसाय तेजित आले आहे. सणावळी निमित्ताने देवदर्शनासाठी दाखल झालेल्या भाविकांमुळे दैनंदिन हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Increased crowd of tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.