देवदर्शनासाठी भाविकांची वाढली गर्दी

By Admin | Updated: May 21, 2014 01:09 IST2014-05-21T01:09:37+5:302014-05-21T01:09:37+5:30

पंचवटी : उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने परराज्यातून देवदर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या संख्येत वाढ

Increased crowd of devotees to show progress | देवदर्शनासाठी भाविकांची वाढली गर्दी

देवदर्शनासाठी भाविकांची वाढली गर्दी

 पंचवटी : उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने परराज्यातून देवदर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या संख्येत वाढ होत असून, पंचवटीतील विविध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून येत आहे. श्री कपालेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, सीतागुंफा, श्री काळाराम मंदिर याठिकाणी भाविक दर्शनासाठी रांगा लावत आहेत. शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपल्याने त्यातच निवडणुकीची रणधुमाळी संपल्याने परराज्यातील अनेक भाविक मोठ्या संख्येने पंचवटीत देवदर्शनासाठी दाखल होत आहेत. परराज्यातून देवदर्शनासाठी येणार्‍या भाविकांमुळे मंदिरे सकाळच्या वेळी भरगच्च दिसून येत आहेत. या भाविकांना वाहने लावण्यासाठी महापालिकेचे वाहनतळ अपुरे पडत असल्याने काही भाविक सोयीनुसार धर्मशाळा तसेच जवळपास असलेल्या मंदिराबाहेरच वाहने उभी करून दर्शनासाठी जात असतात. पंचवटी परिसराला धार्मिक महत्त्व असल्याने रोज शेकडो भाविक गंगाघाटावर आल्यानंतर रामकुंड तसेच गंगा-गोदावरी मंदिराला भेट देऊन तेथे पूजाविधी करून घेत आहेत, तर सीतागुंफा येथे भाविक दर्शनासाठी रांगा लावत असल्याने परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जात आहे. भाविकांची गर्दी वाढल्याने परिसरात विविध वस्तू विक्री तसेच खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांचे व्यवसाय तेजीत आले आहेत. नाशिक दर्शनासाठी आलेले भाविक मुक्कामी थांबत असल्याने धर्मशाळा तसेच हॉटेल, लॉजमध्ये गर्दी वाढत आहे. (वार्ताहर)

Web Title: Increased crowd of devotees to show progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.