नाशिक- वडाळा पाथर्डी रस्त्यावरील वाढणारे अपघात आणि अवजड वाहनांची सर्रास होणारी वाहतूक थांबवण्यासाठी गतिरोधक व बॅरीकेट लावण्याची मागणी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्याकडे नागरिकांकडून करण्यात आली. कलानगर ते पाथर्डीगाव या वडाळा पाथर्डी रस्त्यालगतच सार्थकनगर, श्रद्धाविहार कॉलनी, कैलासनगर, पांडवनगरी, सराफनगर यासह विविध उपनगरे आहेत. या उपनगरातील शेकडोंच्या संख्येने राहणारे नागरिक शहरात ये जा करण्यासाठी वडाळा पाथर्डी रस्त्याचाच वापर करतात. त्यामुळे आणि या रस्त्यालगतच प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालय असल्याने दिवसभर शेकडोच्या संख्येने विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते परंतु बेफान वाहन चालवणारे वाहनधारक आणि अवजड वाहनांमुळे दिवसागणिक लहानमोठया अपघातांची संख्या वाढली आहे. गेले आठ दिवसांपूर्वीच सार्थक नगर बस थांब्यासमोर एका दहा वर्षाच्या बालकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जीवितहानीच्या घटनाही वाढत चालल्याने तातडीने बेफान वाहनधारकांच्या वाहनाची गती रोखण्यासाठी गतिरोधक व बॅरिकेट्स लावावेत आणि अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी नगरसेवकांकडून पोलीस आयुक्तांकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी प्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे, डा.ॅ दीपाली कुलकर्णी, अॅड शाम बडोदे, सुप्रिया खोडे, सुनील खोडे, सचिन कुलकर्णी, अरु ण मुनशेट्टीवार यांसह नागरिकांनी केली आहे.
नाशिकच्या वडाळा पाथर्डी रस्त्यावर अपघातात वाढ, गतीरोधकाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 14:52 IST
नाशिक- वडाळा पाथर्डी रस्त्यावरील वाढणारे अपघात आणि अवजड वाहनांची सर्रास होणारी वाहतूक थांबवण्यासाठी गतिरोधक व बॅरीकेट लावण्याची मागणी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्याकडे नागरिकांकडून करण्यात आली. कलानगर ते पाथर्डीगाव या वडाळा पाथर्डी रस्त्यालगतच सार्थकनगर, श्रद्धाविहार कॉलनी, कैलासनगर, पांडवनगरी, सराफनगर यासह विविध उपनगरे आहेत. या उपनगरातील शेकडोंच्या संख्येने राहणारे नागरिक ...
नाशिकच्या वडाळा पाथर्डी रस्त्यावर अपघातात वाढ, गतीरोधकाची मागणी
ठळक मुद्देबेफान वाहन चालवणारे वाहनधारक आणि अवजड वाहनांमुळे दिवसागणिक लहानमोठया अपघातांची संख्या वाढलीआठ दिवसांपूर्वीच सार्थक नगर बस थांब्यासमोर एका दहा वर्षाच्या बालकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली