शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील निम्म्या धरणांतील साठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 01:51 IST

जिल्ह्यातील नाशिकसह येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या तालुक्यांत बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने निम्म्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही अन्य तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिलेली असल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईसह बळीराजावरही दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्दे२५ टक्के पाणीसाठा : काही तालुक्यांत पावसाची प्रतीक्षा

नाशिक : जिल्ह्यातील नाशिकसह येवला, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या तालुक्यांत बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने निम्म्या धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्यापही अन्य तालुक्यांमध्ये पावसाने ओढ दिलेली असल्याने ग्रामस्थांवर पाणीटंचाईसह बळीराजावरही दुबार पेरणीचेसंकट ओढवले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६.८४ टक्के पावसाची नोंद झाली असून, धरणांतील पाणीसाठा २५ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे.जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि येवला या तालुक्यात बºयापैकी पावसाची नोंद झालेली आहे. विशेष म्हणजे कायम दुष्काळी असलेल्या येवला तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक २५० मि.मी. म्हणजे ५७.६७ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. त्याखालोखाल नाशिक (६५.४० टक्के), इगतपुरी (४५.४७ टक्के), दिंडोरी (३४.३४ टक्के), पेठ (४१.५५ टक्के), त्र्यंबकेश्वर (४४.५३ टक्के), सुरगाणा (३१.०७ टक्के), निफाड (५७.६७ टक्के) याप्रमाणे पाऊस पडलेला आहे. तर मालेगाव (२७ टक्के), नांदगाव (११.५६ टक्के), चांदवड (१३.७० टक्के), कळवण (७.२३ टक्के), बागलाण (२५.७६ टक्के), देवळा (९.०२ टक्के), निफाड (२९.६२ टक्के) या तालुक्यांत पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ३६.८४ टक्के पावसाची नोंद झालेली असून, मागील वर्षी याच कालावधीत ४७ टक्के पाऊस झालेला होता. जिल्ह्यात कळवण आणि देवळा तालुक्यात भीषण परिस्थिती आहे. तेथे पावसाने ओढ दिल्याने दुबार पेरणीचे मोठे संकट येऊन ठेपले आहे. जिल्ह्यात काही तालुक्यात बºयापैकी पावसाची नोंद झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. मात्र, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरणा, पुनंद आणि माणिकपुंज या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे या भागातील पाणीटंचाई अधिक तीव्र बनत चालली आहे.नांदूरमधमेश्वरमध्ये सर्वाधिक साठाजिल्ह्यातील निम्म्या धरणांतील पाणीसाठ्यात बºयापैकी वाढ झालेली आहे. त्यात नांदूरमधमेश्वर प्रकल्प ९८ टक्के भरले आहे. त्याखालोखाल भावली (८० टक्के), दारणा (७१ टक्के), वालदेवी (५७ टक्के), गंगापूर (५४ टक्के), कडवा (५२ टक्के), गौतमी गोदावरी (३७ टक्के), काश्यपी (३५ टक्के), आळंदी (३० टक्के), मुकणे (२३ टक्के) याप्रमाणे पाणीसाठा वाढला आहे. पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, चणकापूर, केळझर, माणिकपुंज हे प्रकल्प अद्यापही कोरडेठाक पडलेले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी