किमान तपमानात सहा अंशांनी वाढ
By Admin | Updated: January 1, 2015 01:13 IST2015-01-01T01:13:40+5:302015-01-01T01:13:51+5:30
किमान तपमानात सहा अंशांनी वाढ

किमान तपमानात सहा अंशांनी वाढ
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मध्य महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट आली आहे. ढगाळ वातावरण आणि दाट धुके असल्याने मोसमातील सर्वाधिक थंडीचा सामना नाशिककरांना करावा लागला. असे असताना, बुधवारी तपमानाचा पारा एकाच दिवसात ६ अंशांनी वधारला.
पहाटे आणि रात्रीच्या सुमारास चांगलीच थंडी पडू लागली आहे. दोन दिवसांपासून शहराच्या तपमानात घट होत असून, मंगळवारी पारा नीचांकी सहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. परिणामी, रात्रीच्या वेळेस नाशिककरांना हुडहुडी भरली. मध्य समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर आलेल्या पावसाने परिणाम झाला होता. त्यामुळे थंडी वाढली आहे. याचदरम्यान उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीने जोर धरला असून, त्यामुळे तपमानातही घट होते आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी वर्तविली आहे. थंडी वाढण्याबरोबरच गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गारवा ओसरला असून, पाराही वधारला आहे. (प्रतिनिधी)