लग्नसराईमुळे फळभाज्यांच्या दरात वाढ
By Admin | Updated: June 2, 2014 01:18 IST2014-06-02T01:03:22+5:302014-06-02T01:18:18+5:30
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणार्या शेतमालाला लग्नसराईमुळे मागणी असल्याने बाजारभाव तेजीत आहेत.

लग्नसराईमुळे फळभाज्यांच्या दरात वाढ
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणार्या शेतमालाला लग्नसराईमुळे मागणी असल्याने बाजारभाव तेजीत आहेत. सध्या उन्हाळा सुरू असल्याने शेतमालाची साधारणपणे वीस टक्क्यांपर्यंत आवक घटलेली आहे. आणखी काही दिवस मागणी कायम राहिल्यास फळभाज्यांचे बाजारभाव टिकून राहतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. बाजार समितीत सध्या कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, टमाटा, वांगी, कारले आदि फळभाज्या माल विक्रीसाठी दाखल होत असून, लग्नसराईमुळे फळभाज्यांना मागणी वाढली आहे. कोबी वगळता सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव टिकून आहेत, तर कारल्याच्या बाजारभावात वाढ झाल्याने १२ किलो ग्रॅम वजनाच्या जाळीला ६०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. मात्र कोबीच्या दरात घसरण झाली असून, २५ ते ५० रुपये प्रतिजाळी या दराने विक्री होत आहे. टमाट्याला सात ते आठ रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळत आहे.