निर्यातमूल्य वाढविल्याने कांदा भाव स्थिर

By Admin | Updated: July 28, 2014 00:50 IST2014-07-27T22:31:50+5:302014-07-28T00:50:41+5:30

टमाट्याचे बाजारभाव १०२० रुपये प्रतिजाळी

With the increase in the price, the onion prices are stable | निर्यातमूल्य वाढविल्याने कांदा भाव स्थिर

निर्यातमूल्य वाढविल्याने कांदा भाव स्थिर

लासलगाव : लासलगाव येथील बाजार पेठेत कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्याने भाव स्थिर होते. उन्हाळ कांद्याची आवक ४८६०५ क्विंटल होऊन बाजारभाव रुपये ७०० ते २२६१ सरासरी १७८० प्रति क्विंटल होते.
भुसार व तेलबिया शेतमालाचे आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होेते : गहु (१२४ क्विंटल) भाव १६४६ ते २०७६ सरासरी १६६५ रुपये, बाजरी (२४ क्विंटल) लोकल भाव १५३१ ते २१५२ सरासरी १७६५ रुपये, हायब्रीड भाव १३४० ते १३४० सरासरी १३४० रुपये, हरबरा (१३६ क्विंटल) भाव १७९९ ते २७०४ सरासरी, जंबुसार भाव रुपये १८७५ ते २७५२ सरासरी २६१९ रुपये, काबुली भाव २२०० ते ४५५१ रुपये सरासरी २७४० रुपये, ज्वारी (२ क्विंटल) भाव १४५२ ते २७७७ सरासरी २११४ रुपये, मका (१२५ क्विंटल) भाव १३८६ ते १४५५ सरासरी १४११ रुपये, तूर (७ क्विंटल) भाव २८०० ते ३८०० सरासरी ३७०७ रुपये प्रति क्विंटल होते.
भाजीपाल्याचे आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते : मेथी (३११८५ जुडी) कमाल भाव १६३१, तर सर्वसाधारण भाव ९७३ रुपये, कोथिंबीर (११२०० जुडी) कमालभाव ३३२०, तर सर्वसाधारण भाव १९१५ रुपये, तसेच काकडी (२८९ क्रे टस) कमाल भाव ३६२, तर सर्वसाधारण भाव २७५ रुपये, भोपळा (९२९८
क्रे टस) कमाल भाव १७१, तर सर्वसाधारण भाव १३९ रुपये, कारले (२७० क्रे टस) कमाल भाव ४७०, तर सर्वसाधारण भाव ३८२ रुपये, मिरची शिमला (१९५ क्रेटस) कमाल भाव ३४१, तर सर्वसाधारण भाव ३०८ रुपये, टमाटा (२०१ क्रे टस) कमाल भाव १०१५, तर सर्वसाधारण भाव ८६५ रुपये, दोडके (७६ क्रे टस) कमाल भाव ५२५, तर सर्वसाधारण भाव ४०४ रुपये, भेंडी (१३ क्विंटल) कमाल भाव३८०० तर सर्वसाधारण भाव ३३०६ रुपये, मिरची (हिरवी) (२३ क्विंटल) कमाल भाव ७५०१, तर सर्वसाधारण भाव ६४०० रुपये, वांगी (१० क्विंटल) कमाल भाव २०११, तर सर्वसाधारण भाव १३८५ रुपये प्रति क्विंटल होते. (वार्ताहर)

Web Title: With the increase in the price, the onion prices are stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.