इंदिरानगर परिसरात बालमजुरांच्या संख्येत वाढ
By Admin | Updated: September 21, 2016 00:16 IST2016-09-21T00:16:42+5:302016-09-21T00:16:58+5:30
इंदिरानगर परिसरात बालमजुरांच्या संख्येत वाढ

इंदिरानगर परिसरात बालमजुरांच्या संख्येत वाढ
इंदिरानगर : परिसरात लहान-मोठ्या व्यावसायिकांकडे बालमजुरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तरीही संबंधित विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच संबंधित विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळेच बालमजुरांची संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, दीपालीनगर, सुचितानगर, राणेनगर, समर्थनगर यांसह परिसरात दिवसागणिक लहान- मोठे व्यावसायिक वाढत आहेत. यात किराणा माल, हॉटेल्स, गॅरेज, हार्डवेअर, पार्सल पाइंटसह विविध व्यवसाय येतात. त्यामुळे व्यवसायात मदतीसाठी कामगार व मजूर प्रत्येकालाच आवश्यक असतात. परंतु काही व्यावसायिक कमी वेतनात या बालमजुरांना कामावर ठेवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बालमजूर कायदा निर्माण करण्यात आला आहे. परंतु तो कायदा फक्त कागदोपत्रीच दिसून येत आहे. वाढती बालमजुरांची संख्या बघता संबंधित विभागाच्या गलथान कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)