डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ
By Admin | Updated: November 16, 2015 23:18 IST2015-11-16T23:17:47+5:302015-11-16T23:18:30+5:30
डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ

डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ
नाशिक : शहरातील डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातच सहा रुग्ण आढळले आहेत.
शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिकेच्या वतीने याबाबत रुग्ण संख्या कमी असल्याचे सांगण्यात येत असले तरी खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढतच आहे. पालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात ५८ रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २० रुग्णांचे नमुने प्राप्त झाले आहेत. त्यातील १४ अहवाल निगेटिव्ह, तर सहा अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबरमध्ये ६२७ रुग्ण नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २६१ पॉझिटिव्ह आढळले आहेत. (प्रतिनिधी)