वणीत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:08 IST2020-09-12T22:01:05+5:302020-09-13T00:08:46+5:30

वणी : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाच्यावतीने विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. बाधितांची संख्या चिंताजनक असल्याने कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वकष प्रयत्न होणे आवश्यक आहे.

Increase in the number of corona infections in the vagina | वणीत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

वणीत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ

ठळक मुद्देनिणर्यावर एकमत होत नाही

वणी : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाच्यावतीने विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. बाधितांची संख्या चिंताजनक असल्याने कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वकष प्रयत्न होणे आवश्यक आहे. या आठवड्यात तर सरासरी आकडेवारी नागरिकांची काळजी वाढविणारी आहे. बाधित सापडताच ग्रामपालीकेत बैठकीचे आयोजन करण्यात येते. चर्चेच्या फैरी झडतात. निणर्यावर एकमत होत नाही व पुन्हा समस्या प्रलंबित राहते. प्रांतअधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या प्रशासकीय निर्णय , उपाययोजना , प्रभावी अंमलबजावणी व नागरीकांचे सहकार्य याचा समन्वय साधने ही तारेवरची कसरत आहे. फिजीकल डिस्टन्स व मास्क लावणे या सुचना वारंवार ग्रामपालीका स्तरावर दिल्या जातात याचे पालन करणे अपेक्षित आहे. गर्र्दी न करणे, सॅनिटाईझरचा वापर अशा मार्गदर्शक सुचना नागरिकांना देणे गरजेचे आहे.

 

Web Title: Increase in the number of corona infections in the vagina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.