सायकल्स चोरीच्या घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:09 IST2021-02-19T04:09:35+5:302021-02-19T04:09:35+5:30

सनद वाटपाचे काम सुरू नाशिक : शहरातील गंगापूर, आनंदवली येथील नगर भूमापन मिळकतीसंदर्भात सनद वाटपाचे काम सुरू झाले आहे. ...

Increase in incidents of bicycle theft | सायकल्स चोरीच्या घटनांमध्ये वाढ

सायकल्स चोरीच्या घटनांमध्ये वाढ

सनद वाटपाचे काम सुरू

नाशिक : शहरातील गंगापूर, आनंदवली येथील नगर भूमापन मिळकतीसंदर्भात सनद वाटपाचे काम सुरू झाले आहे. नगर भूमापन विभागाने यासंदर्भात नागरिकांना आवाहन केले होते. ज्या नागरिकांनी आपल्या मिळकतीसंदर्भात सनद प्राप्त करवून घेतली नाही त्यांनी सनद प्राप्त करवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दहावी, बारावी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना

नाशिक : आदिवासी विकास विभागाच्यावतीने दहावी, बारावीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन योजना लागू करण्यात आलेली आहे. आश्रमशळा, एकलव्य निवासी शाळा, तसेच इतर शाळांमध्ये शिकणाऱ्या विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस योजना लागू करण्यात आली असल्याची माहिती आदिवासी उपायुक्त अविनाश सोनवणे यांनी दिली.

अभिनव शाळेत एकदिवसीय कार्यशाळा

नाशिक : मानव संसाधन विकास केंद्र आणि अभिनव बालविकास मंदिर गंगापूर रोड यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्वप्राथमिक व प्राथमिक मुख्याध्यापक यांचे कार्यात्मक कौशल्य व वर्तन विकास एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

Web Title: Increase in incidents of bicycle theft