डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ
By Admin | Updated: August 26, 2016 22:33 IST2016-08-26T22:32:20+5:302016-08-26T22:33:15+5:30
महापालिकेचा सिडको विभाग उदासीन : कॉँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन

डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ
सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको तसेच परिसरात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ झाली असून, महापालिका याबाबत उदासीन असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. डेंग्यूच्या फैलावाबाबत उपाययोजना करावी, यासाठी सिडको विभागीय कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मनपाच्या विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सिडको विभागात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सिडको परिसर हा दाट लोकसंख्या असलेला भाग असून याठिकाणी थंडी, हिवताप यांसारखे हजारो रुग्ण असतानाच गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. डेंग्यूच्या फैलावावर तातडीने उपाययोजना करावी, याबाबत सिडको विभाग कॉँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. ब्लॉक अध्यक्ष मीरा साबळे, नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांच्या नेत्ृात्वाखाली मनपा सिडको विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांना निवेदन दिले. निवेदनात डासांच्या फैलावाबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच वेळोवेळी औषध व धूर फवारणी करावी. गेल्या अनेक महिन्यांपासून फॉगिंगची कामे बंद असून, तीदेखील सुरू करावी. प्रभागामध्ये घंटागाडी अनियमित येत असल्याने यात सुधारणा करून घंटागाडी नियमित करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी माणिक जायभावे, डॉ. प्रशांत आंबरे, सुभाष पाटील, सूरज चव्हाण, संतू पाटील, बाळू साळवे, मनीषा जमदाडे, निंबा जाधव, मनोज बोडके, गोकूळ जायभावे, माधव पुजारी, अशोक जायभावे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)