शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

सुकामेव्याच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 17:14 IST

थंडीचा पारा १४ अंशापर्यंत घसरल्यामुळे बाजारात नागरिकांकडूनही सुकामेव्याच्या मागणी केली जात आहे. यात खारीकचे दर ३७० कलम हटविल्यामुळे बाजारात खारीक २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

ठळक मुद्देथंडीचा पारा १४ अंशापर्यंत घसरल्यामुळे सुकामेव्याला मागणी३७० कलमामुळे खारीकचे दर गगणालाखारीक २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री

 नाशिक : शहरात थंडीचे आगमन होत असतांनाच सुकामेव्याच्या पदार्थांनी बाजारपेठ सजण्यास सुरु वात झाली आहे. थंडीचा पारा १४ अंशापर्यंत घसरल्यामुळे बाजारात नागरिकांकडूनही सुकामेव्याच्या मागणी केली जात आहे. यात खारीकचे दर ३७० कलम हटविल्यामुळे बाजारात खारीक २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.      नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापासूनच शहरातील तापमान घसरण्यास सुरुवात झाली होती. मात्र गेल्या एक दोन दिवसांपासून तापमान सतत घसरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात पहाटेच्या सुमारास फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य संवर्धनासाठी उबदार कपडयांबरोबरच सुकामेवा खरेदी करण्यासही प्रारंभ केला आहे. खास करुन डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सुकामेव्यास नाशिकमध्ये मोठी मागणी असते. सुकामेव्याच्या खरेदीला विशेषत: डिसेंबरमध्ये प्रतिसाद मिळतो. परंतु, यंदा डिसेंबरमध्ये जाणवणाºया थंडीचे आगमन नोव्हेंबर महिन्यातच जाणवु लागले आहे. सुकामेव्याला आरोग्यसंवर्धासाठी विषेश महत्त्व आहे. त्यामुळे बाजारात सुकामेव्याची मागणी वाढु लागली आहे.३७० कलमामुळे खारीक महागलीकेंद्र सरकारने काही महिन्यांपुर्वी काश्मिरमधे लावण्यात आलेला ३७० कलम हटविल्यामुळे पाकिस्तानमधुन भारतात काही गोष्टींची निर्यात बंद करण्यात आली होती. खारीक ही मुख्यत: पाकिस्तानमधुन भारतात येत असते. मात्र सध्या पाकिस्तानची खारीक भारतात येणे बंद झाल्याने इतर देशांतुन खारीक आयात करावी लागत आहे. त्यामुळे खारीकचे दर मागील वर्षीच्या तुलनेत तिप्पटीने वाढली आहे.थंडीची चाहुल लागल्यामुळे ग्राहक सुकामेव्याच्या खरेदीला पसंती देत आहे. यात खारीक, खोबरे, काजु, बदाम, मनुका यांना मोठी मागणी आहे. मात्र येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असल्याने सुकामेव्याच्या मागणीत अधिकच वाढ होणार आहे.जयंत पटेल, सुकामेवा विक्रेतेअसे आहेत दर (प्रतिकिलो रुपये प्रमाणे)खारीक : २५० ते ३००अक्रोड : ६५० ते ७५०बदाम : ७५० ते ९००काजु : ८०० ते ११००काळा मनुका : ४०० ते ६००साधा मनुका : १८० ते २४०खारे पिस्ता : १००० ते १४००अंजीर : ९०० ते १३००डिंक : १८० ते २००खोबरे: २०० ते २२०साधे खजुर : १२० ते १५०काळे खजुर : ३०० ते ३४०

टॅग्स :NashikनाशिकMarketबाजार