केबीसी संशयितांच्या कोठडीत वाढ
By Admin | Updated: July 22, 2014 01:01 IST2014-07-21T23:26:15+5:302014-07-22T01:01:25+5:30
सोमवारपर्यंत साडेचार हजार तक्रारदार : फसवणुकीची रक्कम १३७ कोटींवर

केबीसी संशयितांच्या कोठडीत वाढ
नाशिक : केबीसी मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी केलेली मराठवाडा, विदर्भ, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यासह हजारो गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या फ सवणूक प्रकरणात आडगाव पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयितांच्या पोलीस कोठडीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩयूक़ापडी यांनी २४ जुलैपर्यंत वाढ केली आहे़ दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील केबीसीच्या प्रमुख कार्यालयाची झडती घेण्याची परवानगीही पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली आहे़
आडगाव पोलिसांनी केबीसीचे संचालक बापूसाहेब चव्हाण, व्यवस्थापक व एजंट पंकज श्ािंदे, वाहनचालक नितीन शिंदे यांना सोमवार (दि़१४) रोजी नांदूरनाका परिसरात वाहनातून जात असताना अटक केली, तर मंगळवारी (दि़१५) रोजी नानासाहेब चव्हाण, साधना चव्हाण, पोलीस कर्मचारी संजय जगताप यांना अटक केली होती़ या सर्वांना न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली होती़ या सर्वांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज न्यायालयासमोर हजर केले असता गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे़
सोमवारी आडगाव पोलिसांनी न्यायालयात केबीसीच्या मुख्य कार्यालयाची झडती घेण्याची परवानगी मागितली आहे़ केबीसीने फ सवणूक केलेल्या तक्रादारांच्या संख्येत व रकमेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ (प्रतिनिधी)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत तक्रारदारांची संख्या साडेचार हजारांपर्यंत पोहोचली असून, फसवणुकीची रक्कम १३७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे़
सशयितांच्या बँक खात्यांची चौकशी
केबीसी फ सवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित भाऊसाहेब चव्हाण,आरती चव्हाण, बापूसाहेब चव्हाण,साधना चव्हाण,नानासाहेब चव्हाण,पोलीस कर्मचारी संजय जगताप, कौसल्या जगताप, भारती शिलेदार यांच्या बँक खात्यांची माहिती पोलिसांना कळवावी असे पत्र बँकांना पाठविण्यात आले आहे़ तसेच या खात्यातील व्यवहार बंद करावेत तसेच लॉकरची माहिती द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे़ या पत्रान्वये काही बँकांनी आम्हाला तशी माहिती दिली आहे़
-अनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आडगाव़
गुंतवणूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा
फ सवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी छावा संघटनेच्या माध्यमातून केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीची स्थापना केली आहे़ या समितीच्या वतीने बुधवार (दि़२३) सकाळी १० वाजता गोल्फ क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे़ यामध्ये मराठवाडा, विदर्भ,अहमदनगर, तसेच नाशिक जिल्ह्णातील सुमारे पाच हजार गुंतवणूकदार सहभागी होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष करण गायकर,कार्याध्यक्ष गणेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली़