दुहेरी खुनातील संशयितांच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:16 IST2018-01-02T01:13:48+5:302018-01-02T01:16:07+5:30

नाशिक : दुचाकीची नुकसानभरपाई व जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघांचा धारदार हत्याराने खून केल्याची घटना २८ डिसेंबरला इंदिरानगर परिसरातील राजीवनगरमध्ये घडली होती़ या खून प्रकरणातील सहा संशयितांना सोमवारी (दि़१) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे़

Increase in the custody of double murder suspects | दुहेरी खुनातील संशयितांच्या कोठडीत वाढ

दुहेरी खुनातील संशयितांच्या कोठडीत वाढ

ठळक मुद्देदुचाकीची नुकसानभरपाईजुन्या भांडणाची कुरापत काढून दोघांचा धारदार हत्याराने खून

नाशिक : दुचाकीची नुकसानभरपाई व जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघांचा धारदार हत्याराने खून केल्याची घटना २८ डिसेंबरला इंदिरानगर परिसरातील राजीवनगरमध्ये घडली होती़ या खून प्रकरणातील सहा संशयितांना सोमवारी (दि़१) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे़
२८ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दिनेश नीळकंठ बिराजदार (२२, रा. गणेश चौक) व देवीदास वसंत इगे (रा. राजीवनगर झोपडपट्टी) व त्यांच्या तिसºया साथिदारासोबत जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयित दीपक दत्ता वाव्हळ (२१), कृष्णा दादाराव शिंदे (२२), रवि गौतम निकाळजे, सचिन गौतम निकाळजे, नितीन पंडित, बबलू डंबाळे यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात या सहा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ या संशयितांना न्यायालयाने यापूर्वी सोमवारपर्यंत (दि.१) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

Web Title: Increase in the custody of double murder suspects