शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गत मका खरेदीचा वेग वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:21 IST

मका साठवणुकीसाठी गुदाम उपलब्ध झाल्याने ज्या शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, अशा शेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी धीम्या गतीने चालणाºया खरेदीप्रक्रियेचा वेग वाढवणे गरजेचे आहे. ४ डिसेंबर २०१७ पासून सुरू झालेल्या शासकीय मका खरेदी योजनेंतर्गत एमआयटी कॉलेज धानोरा येथील गुदाम व एसएनडी कॉलेज येवला येथील गुदामात १९ जानेवारी २०१८ अखेर ३४० शेतकºयांची १८५०० क्विंटलची मका खरेदी झालेली आहे.

येवला : मका साठवणुकीसाठी गुदाम उपलब्ध झाल्याने ज्या शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, अशा शेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी धीम्या गतीने चालणाºया खरेदीप्रक्रियेचा वेग वाढवणे गरजेचे आहे.  ४ डिसेंबर २०१७ पासून सुरू झालेल्या शासकीय मका खरेदी योजनेंतर्गत एमआयटी कॉलेज धानोरा येथील गुदाम व एसएनडी कॉलेज येवला येथील गुदामात १९ जानेवारी २०१८ अखेर ३४० शेतकºयांची १८५०० क्विंटलची मका खरेदी झालेली आहे.  या मक्याची रक्कम दोन कोटी ६३ लाख ६२ हजार रुपये एवढी आहे. यापैकी केवळ १०० शेतकºयांना ९० लाख रु पये मिळाले आहेत. उर्वरित २४० शेतकºयांची एक कोटी ७३ हजारांची रक्कम संबंधित मका उत्पादक शेतकºयांना अद्याप मिळणे बाकी आहे. खासगी बाजारभावापेक्षा शासकीय आधारभूत किमतीने खरेदी होणाºया केंद्रावर मका विक्र ीला किमान पाचशे रु पये प्रतिक्विंटल अधिक मिळत असल्याने शेतकºयांचा या केंद्रावर मका विक्र ी करण्यावर कल दिसून येत आहे. परंतु गेल्या महिन्यापासून शासनाकडून विक्री झालेल्या मालाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.  तालुक्यात यंदा मक्याचे विक्र मी उत्पादन वाढले असून, मक्याला स्थानिक व्यापाºयांकडून १००० ते ११५० रु पयांपर्यत सरासरी भाव मिळत आहे. या तुलनेत तालुका खरेदी-विक्री संघामार्फत होणाºया शासकीय आधारभूत खरेदीत प्रतिक्विंटल १४२५ रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकºयांनी शासकीय मका खरेदी केंद्राकडे धाव घेतली आहे.  सध्या ३१ डिसेंबरपर्यंत आॅनलाइन नोंदणी केलेल्यांची मका खरेदी करणे सुरू आहे; परंतु खरेदी धीम्या गतीने चालू आहे. शेतमालाचे पैसे तत्काळ देण्याचे आदेश करणाºया शासनाने अधिकृतपणे खरेदी केलेल्या मालाचे पैसे तालुक्यातील एकाही मका  उत्पादक शेतकºयास महिन्यापासून मिळाले नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शासनापेक्षा खासगी व्यापारी परवडले शासनापेक्षा खासगी व्यापारी परवडले अशी प्रतिक्रि या काही शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. शासनाने शेतकºयांच्या अडचणी व हित लक्षात घेऊन मालाचे पैसे त्वरित वर्ग करावेत, अशी मागणी तालुक्यातील सर्व शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. १७५९ आॅनलाइन नोंदणीधारक शेतकºयांपैकी ४३५ क्रमांकापर्यंतच्या शेतकºयांना माल विक्र ीसाठी आणण्याच्या सूचना केल्या असून, पैकी ३७५ शेतकºयांनी मका विक्र ी केला आहे. अद्याप १३८४ शेतकरी प्रतीक्षेत आहेत.  मका नोंदणीधारक शेतकºयांची संख्या मोठी आहे. गुदामाअभावी मका खरेदी केंद्र बंद होऊ नये म्हणून येवला तहसील कार्यालयाने एमआयटी कॉलेज धानोरा, कृउबा उपबाजार अंदरसूल व पाटोदा येथील व तालुक्यातील ग्रामीण भागातील गुदाम उपलब्ध करून देत मका खरेदी केंद्र विनाखंडित सुरू ठेवावी, अशी मागणी मका उत्पादक शेतकरीवर्गाकडून होत आहे.