नववर्षाच्या पहिल्या महिन्यात दुचाकी नोंदणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:43+5:302021-02-05T05:39:43+5:30
जानेवारी २०२१ अखेर ८ हजार ६१४ नवीन दुचाकी तर तीनचाकी, चारचाकी तसेच मालवाहू शेती ट्रॅक्टर या एकूण २६७१ वाहनांची ...

नववर्षाच्या पहिल्या महिन्यात दुचाकी नोंदणीत वाढ
जानेवारी २०२१ अखेर ८ हजार ६१४ नवीन दुचाकी तर तीनचाकी, चारचाकी तसेच मालवाहू शेती ट्रॅक्टर या एकूण २६७१ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जानेवारीत सर्व प्रकारच्या ९४५९ वाहनांची नोंदणी झाली होती. यावर्षी जानेवारीत ११ हजार २८५ वाहन नोंद झाल्याने वाहने खरेदी कल वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत ६५१४ दुचाकीची नोंदणी करण्यात आली होती. यंदा जानेवारीत ही संख्या वाढून ८६१४ इतकी झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत २०९० दुचाकी वाहन वाढल्याचे स्पष्ट झाले. गतवर्षी जानेवारीत एकूण वाहन नोंदणी संख्या नववर्षातील जानेवारीत नोंदणी आकडेवारी बघता यंदा एकूण १८२६ नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षी ३२४ रिक्षांची नोंद होती, तर या वर्षी ९८ रिक्षांची नोंदणी झाली आहे. यंदा शालेय बसची एकही नोंदणी झालेली नाही. गतवर्षी एका महिन्यात १९ बसची नोंदणी झाली होती. ट्रक, लॉरीचीही संख्या घटून १७० ने कमी झाली आहे. टॅक्सी, मोटर, लक्झरी टुरिस्ट कारचीदेखील एकही नोंदणी झालेली नाही. गेल्या वर्षी २१ वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. मोटारकारच्या संख्येत ६६ ने वाढ झाली असून, गतवर्षी १५०० मोटारकार नोंदणी होती, तर यंदा हीच संख्या १५६६ इतकी झाली आहे.
इन्फो===
आकर्षक क्रमांकाला पसंती कायम
नवीन दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी केल्यानंतर पसंती क्रमांकाला वाहनधारकांकडून मागणी कायम असल्याचे दिसून येते. एप्रिल ते डिसेंबर २०२० या नऊ महिन्यांच्या कालावधीत २८१८ वाहनधारकांनी आकर्षक क्रमांकाला पसंती दिली. या आकर्षक क्रमांक नोंदणीतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दोन कोटी ४१ लाख ५१ हजाराचा महसूल प्राप्त झाला आहे.
- विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी