मेथीची आवक वाढल्याने सात रुपये जुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 00:36 IST2019-12-07T00:02:37+5:302019-12-07T00:36:27+5:30

गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव काही प्रमाणात घसरलेले आहे. शेतातील पिकांना सध्या चांगले पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतमाल लवकर तयार होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात मेथीच्या प्रति जुडीला सात रुपये, असा बाजारभाव मिळाला. आवक वाढल्याने मेथीचे बाजार घसरले, असे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.

The increase in the arrival of fenugreek added seven bucks | मेथीची आवक वाढल्याने सात रुपये जुडी

मेथीची आवक वाढल्याने सात रुपये जुडी

ठळक मुद्देपालेभाज्या दर कमी झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले

पंचवटी : गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव काही प्रमाणात घसरलेले आहे. शेतातील पिकांना सध्या चांगले पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतमाल लवकर तयार होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात मेथीच्या प्रति जुडीला सात रुपये, असा बाजारभाव मिळाला. आवक वाढल्याने मेथीचे बाजार घसरले, असे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.
गेल्या आठवड्यापासून मेथीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी दर घसरले आहे. काही दिवसांपासून हवामान स्वच्छ असल्याने शेतमालाचे उत्पादन वाढत आहे. सर्वच पालेभाज्या आवक मोठ्या प्रमाणात वाढत असून, आवक वाढल्याने बाजारभाव घसरले आहे, असे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले. रोजच्या जेवणात लागणाºया पालेभाज्या दर कमी झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, एकीकडे मेथी जुडीला कमीत कमी सात रुपये, असा बाजारभाव मिळत असला तरी दुसरीकडे मात्र हातगाडीवर मेथी जुडी खरेदीसाठी ग्राहकांना किमान २० ते २५ रुपये मोजावे लागत आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सिन्नर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मेथीची आवक होत असते. मेथी भाजी पाठोपाठ शेपू, कांदापात या भाज्यांचे दर काही प्रमाणात घसरले आहे.

Web Title: The increase in the arrival of fenugreek added seven bucks

टॅग्स :agricultureशेती