पालथे झोपा अन‌् रक्तातील ऑक्सिजन वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:51+5:302021-05-05T04:24:51+5:30

शहरात कोरोनाचे संकट भयावह रूप धारण करीत आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मनुष्याला सर्वसामान्यपणे पाठीच्या बाजूने किंवा ...

Increase the amount of oxygen in the blood | पालथे झोपा अन‌् रक्तातील ऑक्सिजन वाढवा

पालथे झोपा अन‌् रक्तातील ऑक्सिजन वाढवा

शहरात कोरोनाचे संकट भयावह रूप धारण करीत आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मनुष्याला सर्वसामान्यपणे पाठीच्या बाजूने किंवा डाव्या-उजव्या कुशीवर झोपण्याची सवय असते. अपवादानेच काही लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते. पोटावर झोपण्याच्या क्रियेला सर्वसामान्य बोलीभाषेत पालथे झोपणे असे म्हटले जाते. पालथे झोपण्याची सवयही चांगली आहे. मात्र, यावेळी खूप अधिक वेळ पालथे झोपून राहणेदेखील योग्य नसल्याचे डॉक्टर सांगतात. हवेत २१ टक्के ऑक्सिजन असते, त्यापैकी मनुष्य केवळ ५ टक्के इतके ऑक्सिजन वापरत असतो. यामुळे शरीररातील प्राणवायूची पातळी टिकून राहण्यास मदत होते. पालथे झोपण्यामुळे श्वसनक्रिया बळकट होऊन ऑक्सिजन वाढण्यास नक्कीच मदत होते.

--इन्फो--

असे वाढवा रक्तातील ऑक्सिजन

मनुष्य दर मिनिटाला साधारणपणे १४ वेळा श्वास घेतो. तेव्हा तो ५ टक्के ऑक्सिजन वापरतो. जेव्हा तो पालथा झोपतो, तेव्हा तो दर मिनिटाला एवढ्याच श्वासांत ७ टक्के ऑक्सिजन वापरतो.

शक्यतो उपाशीपोटी पालथे झोपण्यास प्राधान्य दिल्यास अधिक उत्तम ठरते. दुपारच्या जेवणानंतर डाव्या कुशीवर झोपावे, कारण यामुळेही श्वसनास फायदाच होतो, असे ज्येेष्ठ अनुभवी फॅमिली फिजिशियन डॉ. विकास गोगटे यांनी सांगितले. पालथे झोपताना एक काळजी घ्यावी, ती म्हणजे आपल्या मानेची दिशा अधूनमधून बदलत राहावी, जेणेकरून मानेला रग लागणार नाही, असाही सल्ला गोगटे यांनी दिला.

--इन्फो--

...तर पालथे झोपू नये

गर्भवती स्त्रियांनी शक्यतो पालथे झोपणे टाळावे, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तसेच गर्भपिशवीची शस्त्रक्रिया जुनी झालेली असेल, तर पालथे झोपण्यास काहीही हरकत नाही. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रीयांनीसुद्धा आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी टिकवून ठेवण्याकरिता डाव्या-उजव्या कुशीवर झोपावे, तसेच पोटावर दाब येणार नाही, या पद्धतीने उशांची चवड तयार करून त्याचा आधार घेत पालथे झोपल्यास काहीही धोका नसतो, असे ज्येेष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विनिता गोगटे यांनी सांगितले.

--इन्फो--

...असे आहेत पालथे झोपण्याचे फायदे

पालथे झोपल्यामुळे फुप्फुसाच्या तळापर्यंत हवा भरते आणि ऑक्सिजन पोहोचतो. श्वसनक्रियेद्वारे ऑक्सिजन आतमध्ये आणि कार्बनडायऑक्साइड मनुष्य बाहेर काढत असतो या क्रियेला इन्सप्रिएशन असे वैद्यकीय भाषेत म्हटले जाते. पालथे झोपल्याने हवा फुप्फुसाच्या खोलपर्यंत जाते. एकूणच पालथे झोपण्याची क्रिया मनुष्याला बोनस ऑक्सिजन मिळवून देणारी ठरते, असे डॉ. विकास गोगटे म्हणाले. फुप्फुसाचा व्यायामदेखील सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत करायला हवा. दीर्घ श्वास घेत खांदे उंचाविल्यास छातीत हवा भरते, तसेच पोट श्वासाच्या जोरावर पोट फुगवून पुन्हा श्वास सोडावा, हा व्यायामही फुप्फुसांसाठी लाभदायी ठरतो.

---

डमी आहे, नोंद घ्यावी

...

Web Title: Increase the amount of oxygen in the blood