शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गैरसोयीमुळे कर्मचाऱ्यांची नसते निवडणुकीसाठी उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 21:53 IST

देशाचे सरकार ठरविणाऱ्या मतदान प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. परंतु, निवडणूक सेवेत असताना मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचाºयांना पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची गैरसोय होत असल्याने ही जबाबदारी स्वीकारण्यास अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून येत नाही.

ठळक मुद्देनिवडणूक कर्मचाऱ्यांची होते गैरसोयगैरसोयीमुळे कर्मचारी जबाबादारी घेण्यात अनुत्सूक

नाशिक : देशाचे सरकार ठरविणाऱ्या मतदान प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. परंतु, निवडणूक सेवेत असताना मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचाºयांना पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची गैरसोय होत असल्याने ही जबाबदारी स्वीकारण्यास अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता दिसून येत नाही.ग्रामीण भागात पूर्वी स्थानिक पोलीसपाटील, कोतवाल, तलाठी, कर्मचाºयांची आपुलकीने विचारपूस करून आवश्यक सोयी उपलब्ध करून देत असे. परंतु, अलीकडच्या काळात परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे गैरसोय वाढल्याने कर्मचारी निवडणुकीची जबाबदारी टाळण्याचे प्रयत्न करीत असल्याचे काही निवृत्त कर्मचाऱ्यांनी सांगितले. लोकशाही प्रधान असलेल्या आपल्या देशात स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभेसह जिल्हा बँका, मार्केट कमिट्या अशा विविध संस्थांच्या मिळून वर्षात किमान दोन तरी निवडणुका होतात. या निवडणुका यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गावपातळीपासून ते दिल्लीतील निवडणूक आयोगापर्यंत अनेक कर्मचारी कार्यरत असतात. यात प्रामुख्याने शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांचा मोठा समावेश असतो. परंतु हा वर्ग नेहमीच निवडणुकीच्या जबाबदारीपासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करतो. कारण अनेकदा निवडणुकीची जबाबदारी मिळालेल्या मतदान केंद्रावर या कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्थाच नसते. पावसाळ्यात डासांमुळे तर हिवाळ्यात थंडीने कर्मचारी त्रस्त होतात. सोबतच पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांसोबत स्नानगृहाचीही गैरसोय आणि हरवत चाललेल्या संवेदनशीलतेमुळे निवडणूक प्रक्रि येदरम्यानची वाढलेली आक्रमकता असे प्रकार टाळण्यासाठी कर्मचारी निवडणुकीची जबाबदारी स्वीकारण्यास उत्सुक नसतात. त्याचप्रमाणे या समस्यांचा सामना करून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मतदान पेट्या जमा करताना करावी लागणारी प्रतीक्षा आणि ऐनवेळी पूर्ण कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया यामुळे कर्मचारी त्रस्त होत असल्याने निवडणुकीची जबाबदारीच नको, अशी भावना बळावत असल्याचे मत निवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकElectionनिवडणूकpoll of pollsमहापोल