समर्थनगरात बसपास केंद्राअभावी गैरसोय

By Admin | Updated: December 7, 2015 22:29 IST2015-12-07T22:28:37+5:302015-12-07T22:29:09+5:30

समर्थनगरात बसपास केंद्राअभावी गैरसोय

Inconvenience to the Buspass center in the affected area | समर्थनगरात बसपास केंद्राअभावी गैरसोय

समर्थनगरात बसपास केंद्राअभावी गैरसोय

इंदिरानगर : समर्थनगर परिसरात मध्यवर्ती ठिकाणी पास केंद्राअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तातडीने पास केंद्र सुरू करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
शरयूनगर, समर्थनगर, सराफनगर, जनार्दन स्वामीनगर आदिंसह परिसरात दिवसेंदिवस अपार्टमेंट, सोसायटी व कॉलनी वाढत आहेत. त्याचबरोबर लोकवस्ती झपाट्याने वाढत असून, नवनवीन समस्या वाढत आहेत. परिसरात अद्यापपर्यंत स्वतंत्र बस सेवाअभावी तर गैरसोय होत आहे. त्यातच पास केंद्राअभावी विद्यार्थी वर्गाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. परिसरातील विद्यार्थी दररोज माध्यमिक आणि महाविद्यालयात शिक्षणासाठी शेकडोच्या संख्येने शहरात ये-जा करतात. त्यासाठी बहुतेक विद्यार्थी शहर बससेवेचा लाभ घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता तातडीने मध्यवर्ती ठिकाणी पास केंद्र सुरू करावे, अशी मागणी संजय गायकवाड, हितेश बाबरीचा, विजय बोरस्ते, सुरेश शिंदे, समीर देशमुख, विजय जोशी, अखिलेश शर्मा, दिनेश दुबे यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Inconvenience to the Buspass center in the affected area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.