पंचायत समितीच्यावतीने आयकर मार्गदर्शन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 17:51 IST2018-12-20T17:50:57+5:302018-12-20T17:51:16+5:30
देवळा : देवळा पंचायत समितीच्या वतीने आयकर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील विविध खातेप्रमुख व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

पंचायत समितीच्यावतीने आयकर मार्गदर्शन कार्यशाळा
देवळा : देवळा पंचायत समितीच्या वतीने आयकर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील विविध खातेप्रमुख व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. देवळा वाजगाव रस्त्यावरील नवीन तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयकर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी महेश पाटील कार्यक्र माच्या होते. आयकर अधिकारी हरीष अय्यर, व टिडीएस तज्ञ भूषण डागा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना भूषण डागा म्हणाले की, वेळेवर टॅक्स जमा करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी यांची असून टिडीएस रिटर्नसाठी चलन भरतांना होणार्या चुका, मुदतीत आयकर न भरल्यास होणारी दंडात्मक कारवाई, तसेच येणार्या अडचणी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांचे शंका समाधान केले. कार्यशाळेस अधिक्षक आर.आर. सानप, सहा. लेखाधिकारी पी.जे. भांबारे, शरद सुर्यवंशी, प्रभाकर वाडेकर, के.एस. जाधव, शिरीष पवार, आदींसह, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, आरोग्य, पशुसंवर्धन, बांधकाम, कृषी, शिक्षण आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.