नाशिक मध्ये पुन्हा आयकर विभागाचे छापे, बिल्डर, शेअर मर्चंट रडारवर
By संजय पाठक | Updated: June 14, 2023 18:40 IST2023-06-14T18:40:43+5:302023-06-14T18:40:54+5:30
या पूर्वीच्या छाप्यामधील व्यवहारांची तपासणी

नाशिक मध्ये पुन्हा आयकर विभागाचे छापे, बिल्डर, शेअर मर्चंट रडारवर
नाशिक- आयकर विभागाच्या रडारवर पुन्हा एकदा नाशिक आले असून आज या विभागाच्या पथकांनी बिल्डरची आणि त्याच्याशी संपर्क संबंधित शेअर मर्चंट तसेच काही सी ए फर्मवर छापे घातल्याचे वृत्त आहे.
नाशिकमध्ये यापूर्वी पाच बिल्डर्स वर आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यातील एका बिल्डरचे शेअर मार्केटशी संबंधित व्यवहार आढळले असून हे काम करणाऱ्या शेअर मर्चंटवर आयकर विभागाने छापे घातले तर अन्य अनेक ठिकाणी एकाच वेळी हे छापा सत्र सुरू आहे.