शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

नार-पारमध्ये प्रवाही वळण योजनेचा समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:16 IST

मालेगाव : नार-पार गिरणा उपसा जोड योजनेच्या प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या खर्चाला शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पात वांजूळपाडा प्रवाही वळण योजनेचा समावेश करावा, निर्धारित वेळेत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावेत, या योजनेच्या कामासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अन्यथा येत्या मे महिन्यात पाणी परिषद घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय व मंत्रालयावर कावड यात्रा (पाणी व विष घेऊन) काढण्याचा निर्धार वांजूळ पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देमालेगाव : जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालयावर कावड मोर्चा काढण्याचा वांजूळपाडा समितीचा निर्धार आदिवासींचाही या योजनेला विरोध नाही.

मालेगाव : नार-पार गिरणा उपसा जोड योजनेच्या प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या खर्चाला शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पात वांजूळपाडा प्रवाही वळण योजनेचा समावेश करावा, निर्धारित वेळेत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावेत, या योजनेच्या कामासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अन्यथा येत्या मे महिन्यात पाणी परिषद घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय व मंत्रालयावर कावड यात्रा (पाणी व विष घेऊन) काढण्याचा निर्धार वांजूळ पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.नार-पार गिरणा उपसा जोड योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी १३ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच दिल्ली येथील वाफकोस प्रा.लि. कंपनीला काम देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वांजूळ पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून समितीकडून वांजूळ पाणी जनजागृती अभियान राबविले जात आहे. नार-पार-अंबिका-औरंगा-ताण-मान या सुरगाणा तालुक्यातील पश्चिमवाहिनी नद्या पूर्ववाहिनी करून गिरणा तापी खोºयात पाणी वळविण्यासाठी प्रवाही वळण योजना राबविण्याची मागणी केली जात आहे.नार-पारच्या सर्वेक्षणाबरोबरच डीपीआरमध्ये प्रवाही वळण योजनेचा समावेश करावा, त्याचेही सर्वेक्षण करण्यात यावे या प्रकल्पाचे सर्वेक्षण दोन महिन्याच्या आत पूर्ण करावे. डॉ. माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार ५० टीएमसी पाणी गिरणा खोºयाला देण्यात यावे, अशी मागणी वांजूळपाडा पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी केली आहे.आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वेक्षणाचा घाट रचला जातो. या योजनेमुळे उत्तर महाराष्टÑाला फायदा होणार आहे. मात्र उत्तर महाराष्टÑातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची याबाबत उदासीनता दिसून येत असल्याचा आरोपही पदाधिकाºयांनी केला आहे. याबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. येत्या मे महिन्यात दाभाडी येथील रोकडोबा मंदिर परिसर आवारात पाणी परिषद घेण्यात येणार आहे. या पाणी परिषदेला आमदार जे.पी. गावित उपस्थित राहणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी व मंत्रालयावर कावड यात्रा काढण्यात येईल, असा निर्धार समितीचे निखिल पवार, अनिल निकम, देवा पाटील आदींसह पदाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत केला आहे.आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र व राज्य शासनांकडून पाणी योजनांची घोषणा झाली आहे. ही योजना मात्र गाजर ठरू नये, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आहे. नार-पार व प्रवाही वळण योजना झाल्यास उत्तर महाराष्टÑाला याचा फायदा होणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही योजनांचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. आदिवासींचाही या योजनेला विरोध नाही.