पुष्पक एक्स्प्रेसमधून पडून एकाचा मृत्यू पाडणी स्टेशननजिकची घटना

By Admin | Updated: May 19, 2014 23:56 IST2014-05-19T22:04:43+5:302014-05-19T23:56:57+5:30

मुकणे, दि. १९ : पाडळी रेल्वे स्टेशन (ता. इगतपुरी) नजिकच्या शेणवड खुर्द शिवारात पुष्पक एक्स्प्रेसमधून तोल जाऊन पडल्याने एकजण ठार झाल्याची घटना आज घडली.

An incident of the station falling in the Pushpak Express, | पुष्पक एक्स्प्रेसमधून पडून एकाचा मृत्यू पाडणी स्टेशननजिकची घटना

पुष्पक एक्स्प्रेसमधून पडून एकाचा मृत्यू पाडणी स्टेशननजिकची घटना

मुकणे, दि. १९ : पाडळी रेल्वे स्टेशन (ता. इगतपुरी) नजिकच्या शेणवड खुर्द शिवारात पुष्पक एक्स्प्रेसमधून तोल जाऊन पडल्याने एकजण ठार झाल्याची घटना आज घडली.
राजू शकील तांबोळी (२३) व संजय गायकवाड दोघेही रा. दिंडोरी हे आज दुपारी बारा वाजेदरम्यान पुष्पक एक्स्प्रेसने कल्याणहून नाशिकरोडकडे जात असताना इगतपुरी तालुक्यातील पाडळी रेल्वे स्टेशन नजीकच्या शेणवड खुर्द शिवारात राजु शकील तांबोळी हे तंबाखू खाण्याच्या तयारीत होते. शेणवड खुर्द शिवारात गाडी वळणावर असताना तांबोळी यांचा तोल जाऊन पोल क्र. १५४/१३0 वर आदळले. सदर घटना गायकवाड यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीची चैन खेचून गाडी थांबवली. यावेळी पाडळी देशमुखचे पोलीस पाटील मधुकर धांडे यांना सदर घटना कळताच वाडीवर्‍हे पोलीसांना घटनेबाबत माहिती दिली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मयत राजू तांबोळी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असून, अधिक तपास वाडीवर्‍हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजपूत, शिंदे आदि करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: An incident of the station falling in the Pushpak Express,