शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
2
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
3
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
4
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
5
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
6
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
7
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
8
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
9
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
10
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
11
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
12
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
13
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
14
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
15
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
16
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
17
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
18
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
19
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
20
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले

पत्र्यांच्या घरांना अचानकपणे आग लागल्याची घटना

By admin | Updated: January 28, 2015 02:14 IST

पत्र्यांच्या घरांना अचानकपणे आग लागल्याची घटना

वडाळागाव : येथील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमधील मांगीरबाबा चौकामध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास झोपडीवजा दोन पत्र्यांच्या घरांना अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. परिसरातील सराईत चोरट्यांनी दोन्ही घरे कुलूपबंद असल्याचा फायदा घेत कुलूप तोडून घरामध्ये लूट केली व त्यानंतर पत्र्याची झोपडीवजा घरे पेटवून दिल्याची चर्चा परिसरात दिवसभर सुरू होती. आगीत भस्मसात झालेल्या घरांमध्ये गोरगरीब मजुरांचा संसार बेचिराख झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीमधील चौकात कापसे कुटुंबीयांची घरे आहेत. त्यापैकी सुशीला एकनाथ कापसे व नवनाथ एकनाथ कापसे यांची घरे कुलूपबंद होती. क ारण नवनाथ यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी रात्रीच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे रात्री घरांमध्ये कोणीही नव्हते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून कुलूप तोडले. दवाखान्याच्या खर्चासाठी लागणारे सात हजार रुपये कपाटातून चोरांनी हातोहात लंपास केले तसेच मंगळसूत्र व पायातले चांदीचे जोडवेदेखील पळवले. मात्र यावरदेखील चोरट्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी थेट या गोरगरिबांच्या संसाराला लक्ष्य करत घरांना आग लावल्याचे कापसे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली घरे जळत असल्याचे पाहून काही नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सिडको अग्निशामक केंद्राचे दोन बंब व मुख्यालयाचा एक असे एकूण तीन बंब घटनास्थळी पोहचले. अग्निशाामक दलाच्या जवानांनी अवघ्या पंधरा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले; मात्र तोपर्यंत घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू, कपडे आगीत भस्मसात झाले होते. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात घटनेची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)