एरंडगावला दारु बंदीसाठी बेमुदत उपोषण
By Admin | Updated: October 9, 2015 23:49 IST2015-10-09T23:48:42+5:302015-10-09T23:49:15+5:30
एरंडगावला दारु बंदीसाठी बेमुदत उपोषण

एरंडगावला दारु बंदीसाठी बेमुदत उपोषण
येवला : तालुक्यातील एरंडगाव येथील अवैध दारूविक्र ी बंद व्हावी, गावातील अतिक्र मणे विनाविलंब हटविण्यात यावीत, या मागण्यांसाठी सचिन खकाळे हा तरुण गुरु वार (दि. ८) पासून एरंडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसला आहे. या उपोषणास गावातील अनेक युवकांसह ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे. अवैध दारूविक्री बंद होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. उपोषणाचा शुक्रवारी दुसरा दिवस होता.
बेकायदा धंद्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी परिसरातून होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीने धुमाकूळ घातला असून, यामुळे तरुण वर्ग व्यसनाधिनतेकडे वळत आहे. यापुढे गावासह परिसरातील दारूबंदीसाठी आपण पुढाकार घेणार असून, बेमुदत उपोषणाबरोबरच तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही सचिन खकाळे यांनी सांगितले. पोलिसाशिवाय अन्य कोणीही नेता या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आला नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. (वार्ताहर)