बोगस लाभार्थ्यांविरुद्ध बेमुदत उपोषण सुरू
By Admin | Updated: July 26, 2016 00:02 IST2016-07-26T00:02:10+5:302016-07-26T00:02:10+5:30
बोगस लाभार्थ्यांविरुद्ध बेमुदत उपोषण सुरू

बोगस लाभार्थ्यांविरुद्ध बेमुदत उपोषण सुरू
नाशिक : वडाळारोडवरील शिवाजीवाडी व भारतनगर येथे मनपामार्फत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेत बोगस लाभार्थ्यांची नावे घुसविण्यात आल्याचा आरोप करत सदर घरकुले बोगस लाभार्थ्यांकडून परत घ्यावी याकरिता भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अहमद रजा काझी यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांनी मनपासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, शिवाजीवाडी, भारतनगर येथील घरकुल योजनेत अनेक बोगस लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ज्यांचे अतिक्रमण काढलेले नाही अशाही लोकांना घरकुले देण्यात आलेली आहेत. आणखीही बोगस लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्याचे घाटत आहे. सदर घरकुले बोगस लाभार्थ्यांकडून परत घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बेमुदत उपोषणात लाभार्थी सहभागी झाले आहेत.