अंकुर फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या पर्वाचे उद्घाटन
By Admin | Updated: November 28, 2014 22:42 IST2014-11-28T22:42:13+5:302014-11-28T22:42:29+5:30
अंकुर फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या पर्वाचे उद्घाटन

अंकुर फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या पर्वाचे उद्घाटन
नाशिक : समाजातील दुर्लक्षित घटक मुख्य प्रवाहात यावेत व समाजालाही त्यांच्या जगण्याची कल्पना यावी, या उद्देशाने काम करीत असलेल्या अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेच्या अंकुर फिल्म फेस्टिव्हल २०१४ चे उद्घाटन झाले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन मातीमध्ये अंकुराचे बीजारोपण करून करण्यात आले. तसेच कम्युनिटी व्हिडीओने बनविलेल्या बारा माहितीपटांचे अनावरणही यावेळी करण्यात आले. या फेस्टिव्हलचे यंदाचे तिसरे वर्ष होते. याप्रसंगी सत्यमेव जयते या स्टार प्लसवरील कार्यक्रमाचे संयोजक लॅन्सी फर्नांडिस, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे लोकेश शेवडे, हेमंत बेळे, जितेंद्र पगारे, अभिव्यक्ती मीडिया संयोजन समितीचे सदस्य रणजित गाडगीळ आदि उपस्थित होते. उपेक्षित घटकांचे चित्रण व समाजातील अडचणी चांगल्या माहितीपटांच्या आधारे समाजासमोर आणाव्यात, या उद्देशाने २०१० मध्ये अंकुर फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली. रविवारपर्यंत (दि. ३०) हा सोहळा कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये होणार आहे. या चार दिवसांत एकूण ८० माहितीपट दाखविले जाणार आहेत. त्यामध्ये महिलांचे समाजातील परिस्थितीचे वास्तव दर्शविणारे, पर्यावरण, प्रदूषण, शाळा अशा विषयांवर माहितीपट दाखविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)