सतपुरला शिवजन्मोत्सव कार्यालयाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:14 IST2021-02-07T04:14:14+5:302021-02-07T04:14:14+5:30
शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने यावर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सावरकरनगर येथील जाणता राजा मैदानावर उंच स्तंभावर भगवा ध्वज लावण्यात ...

सतपुरला शिवजन्मोत्सव कार्यालयाचा शुभारंभ
शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने यावर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सावरकरनगर येथील जाणता राजा मैदानावर उंच स्तंभावर भगवा ध्वज लावण्यात येणार आहे. १८ फेब्रुवारीला रात्री परिसरातील महिलांच्या उपस्थितीत शिवरायांचा होणार आहे. तर १९ राेजी शिवजन्मोत्सवाच्या दिवशी समितीच्यावतीने शिवपुत्र संभाजीराजे हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. ७२ फूट भव्य रंगमंच, मराठी नाट्यसृष्टीतील नामवंत कलाकार, घोडे, उंट यांचा वापर केला जाईल. श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य दाखवणारे वैशिष्टपूर्ण महानाट्य सादर करण्यात येणार आहे. समितीच्यावतीने शिव पूजनासाठी यावर्षी संभाजी महाराजांचे शौर्य सांगणारा रामशेज किल्ला या ठिकाणाहून माती आणली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
जाणता राजा मैदानावरील कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सीमा हिरे, नगरसेवक दिनकर पाटील, मधुकर जाधव, योगेश शेवरे, शशिकांत जाधव, माधुरी बोलकर, शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष जी.एस. सावळे, कार्याध्यक्ष कांता शेवरे, नंदू जाधव, निवृत्ती इंगोले, दिनकर कांडेकर,स्वप्नील पाटील, नितीन निगळ, किशोर निकम, समाधान देवरे, महेंद्र शिंदे, दीपक आरोटे, विक्रम नागरे आदी शिवप्रेमी उपस्थित होते.
(फोटो ०६ सातपूर) शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सीमा हिरे, दिनकर पाटील, मधुकर जाधव, योगेश शेवरे, शशिकांत जाधव, माधुरी बोलकर, आदी