विंचूरला शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन
By Admin | Updated: September 27, 2014 00:03 IST2014-09-27T00:03:22+5:302014-09-27T00:03:22+5:30
विंचूरला शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन

विंचूरला शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन
विंचूर : येथील ज्ञानप्रबोधिनी शिक्षक संघ व विंचूरकर ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप, राहुल वडघुले होते.
प्रास्ताविकात ज्ञानप्रबोधिनी संघाचे अध्यक्ष कैलास सोनवणे यांनी, यापुढे संघाच्या वतीने समाजोपयोगी उपक्र म घेण्यात येणार असल्याचे सांगितले. कथाकथनकार आप्पासाहेब खोत यांनी कथाकथन या विषयावर पुष्प गुंफले. एकपात्री प्रयोगातून खोत यांनी समाजातील बदलावर निशाणा साधत श्रोत्यांना करमणुकीबरोबरच कथा कथन करून माणुसकीची शिकवण दिली. ‘कोंबडी’ व ‘शाळेतील गॅदरींग’ कथांमधून स्वार्थी स्वभावावर भाष्य करीत घराला घरपण कशाप्रकारे येत असते याची जाणीव त्यांनी करून दिली. कोंबडी कथेतून सासू-सुनांमधील विसंवाद व कोंबडीसारख्या पाळीव प्राण्याला घर कसं असावं समजतं; मात्र माणसाला ते समजत नाही, हे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शाळेची गॅदरींग कथेतून शिक्षण क्षेत्रातील उणिवांवर बोट ठेवून कार्यक्रमातील प्रमुख वक्त्यांची ओळख नसतानाही एका शिक्षकाचा प्रसंग कथन करीत त्यांनी श्रोत्यांना हसविले.(वार्ताहर)
सूत्रसंचालन दिलीप कोथमिरे यांनी केले. कार्यक्र मास पंचायत समिती सदस्य राजाराम दरेकर, कैलास सोनवणे, साधना जाधव, दिलीप चव्हाण, किरण दरेकर, सचिन देशमुख, प्राचार्य जी. जी. पोफळे, संजय खैरे, योगेश खुळे, यशवंत आहेर, जितेंद्र सोमवंशी, रोहित चौधरी उपस्थित होते.