‘छटा आणि जटा’ प्रदर्शनाचे उद्घाटन
By Admin | Updated: September 23, 2015 23:53 IST2015-09-23T23:53:00+5:302015-09-23T23:53:18+5:30
‘छटा आणि जटा’ प्रदर्शनाचे उद्घाटन

‘छटा आणि जटा’ प्रदर्शनाचे उद्घाटन
नाशिक : ध्यान धारणा करणारे साधू, आपल्या जटांचे प्रदर्शन करणारे साधू, नदीच्या पाण्यात सूर मारणारे साधू, डोक्यावरील केसांच्या जटांचे प्रदर्शन करणारे, हट योगा करणारे साधू अशा अनेकविध साधूंच्या भावमुद्रांच्या छायाचित्रणाचे प्रदर्शन अशोकस्तंभ येथील कंसारा कार्यालयात सुरू आहे.
छायाचित्रकार किरण तांबट यांनी ‘छटा आणि जटा’ छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून साधूंचे विश्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यातील अनेक क्षण टिपले आहे. प्रत्येक भाविकांना सिंहस्थाबद्दल आकर्षण आणि कुतूहल असते. भाविकांच्या या कुतुहलापोटी किरण तांबट यांनी ‘छटा आणि जटा’ प्रदर्शन महत्त्वाचे ठरेल असे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
या छायाचित्र प्रदर्शनात नाशिक-त्र्यंबक येथील शैव तसेच वैष्णव साधूंच्या जीवनशैलीवर आधारित त्यांचे पेहराव, आभूषणे, गंध लावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, ध्यान धारणा करून देवाशी एकरूप होण्याची कला अशा अनेक क्षणचित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे. कन्सारा मंगल कार्यालयात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन शनिवारी (दि. २६) संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत खुले असणार आहे. (प्रतिनिधी)