येवला महाविद्यालयात रासेयो विभागाचे उद्घाटन
By Admin | Updated: August 14, 2016 22:30 IST2016-08-14T22:20:00+5:302016-08-14T22:30:43+5:30
येवला महाविद्यालयात रासेयो विभागाचे उद्घाटन

येवला महाविद्यालयात रासेयो विभागाचे उद्घाटन
येवला : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते.
यावेळी बोलताना पोलीेस निरीक्षक पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आनंदी जीवन जगावे, महाविद्यालयात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या शिकलेल्या गोष्टीदेखील विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांसोबत शेअर कराव्यात जेणेकरून सुसंवाद वाढेल. सुसंवादानेच प्रश्न सुटत असतात. विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन आपले वर्तन ठेवावे, असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी सहनशीलता अंगी बाळगावी. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून व समाज-सेवकांकडून ऊर्जा, प्रेरणा घ्यावी, असे डॉ. गमे यांनी सांगितले. प्रास्ताविक रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. टी. एस. सांगळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. हर्षल बच्छाव यांनी केले. आभार विद्यार्थी स्वयंसेवक रु पेश व्हडगर यांनी मानले. व्यासपीठावर अभिमन्यू आहेर, डॉ. लीना पांढरे, डॉ. आर. झेड.
पहिलवान उपस्थित होते.
(वार्ताहर)