गांधीनगर मैदानावर रामलीलेचे उद््घाटन
By Admin | Updated: October 17, 2015 22:59 IST2015-10-17T22:21:47+5:302015-10-17T22:59:12+5:30
गांधीनगर मैदानावर रामलीलेचे उद््घाटन

गांधीनगर मैदानावर रामलीलेचे उद््घाटन
उपनगर : ५० वर्षांची अखंड परंपरा असलेल्या रामलीला नाटिकेचे उद्घाटन गांधीनगर मुद्रणालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले.
गांधीनगर वसाहतीच्या मैदानावर गेल्या पाच दशकांपेक्षा जास्त काळाहून नवरात्रोत्सवानिमित्त भरविल्या जाणाऱ्या रामलीला नाटिकेचे उद्घाटन भारत सरकार मुद्रणालयाचे महाप्रबंधक आनंदकुमार सक्सेना यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्रसिंग, कामगार नेते विजय वाघेले, मनोहर बोराडे, माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे, वंदना मनचंदा, रामलीला समितीचे महासचिव कपिल शर्मा, प्रदीप भुजबळ आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रामलीलेतील कलाकारांची रंगमंचावर गणेश वंदनेने सुरुवात झाली. त्यानंतर रामायणातील रत्नाकर डाकू-नारदमुनी भेट, रावण, कुंभकर्ण वरदान, रावणाचा अत्याचार, श्रावण वध, पुत्रेष्टी यज्ञ, रामजन्म, सीताजन्म आदि रामायणातील विविध दृश्यांचे सादरीकरण करण्यात आले. रामलीलेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने प्रेक्षकांबरोबरच बालगोपाळांनीही गर्दी केली होती. यावेळी उपस्थित बालगोपाळांनी ‘प्रभु रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय’ अशा जयघोषात रामलीलेतील कलाकारांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. (वार्ताहर)