पिंगळवाडेत पोषण आहार सप्ताहाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:13 IST2021-09-25T04:13:28+5:302021-09-25T04:13:28+5:30
बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोषण आहार सप्ताह काळाची गरज असून बालक सुदृढ बनविण्यासाठी अंगणवाडी सेविका यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन ...

पिंगळवाडेत पोषण आहार सप्ताहाचे उद्घाटन
बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोषण आहार सप्ताह काळाची गरज असून बालक सुदृढ बनविण्यासाठी अंगणवाडी सेविका यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन आमदार बोरसे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नामपूर बाजार समितीचे संचालक कृष्णा भामरे, द्राक्ष बागायतदार केदा भामरे, सरपंच लताताई भामरे, पोलीस पाटील बाजीराव भामरे, रामदास भामरे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धुडकू गांगुर्डे, मंगेश शेवाळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका सी. बी. अहिरे उपस्थित होते. याप्रसंगी ताहाराबाद बिटातील करजांड, निताणे, भुयाणे आदी गावातील सर्व अंगणवाडीसेविका उपस्थित होत्या. यावेळी बालवयातील बालकांना लागणाऱ्या पोषण आहाराचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. कार्यक्रमास अंगणवाडी सेविका सुनंदा बच्छाव,केदाबाई अहिरे,अश्विनी भामरे, योगिता कोठावदे, देवळीशिवार अंगणवाडी सेविका खैरनार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.