नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
By Admin | Updated: February 22, 2015 01:38 IST2015-02-22T01:37:14+5:302015-02-22T01:38:50+5:30
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
नाशिक : नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या वादग्रस्त प्रकरणामुळे गतवेळी पोलीस दीक्षान्त समारंभाला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाकडे फिरविलेली पाठ, तर गोविंद पानसरे यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत सुरू असलेले तर्कवितर्क या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद््घाटन झाले़
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या या इमारतीचे उद्घाटनाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पोलीस महासंचालक अरुप पटनायक आदि यावेळी उपस्थित होते़ यावेळी महापौर अशोक मुर्तडक, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप, अपूर्व हिरे, आयुक्त सरंगल, नवल बजाज, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे आदि उपस्थित होते.