श्री संत सेना महाराज विकास संस्थेच्या जागेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 16:34 IST2018-12-03T16:27:48+5:302018-12-03T16:34:38+5:30
इगतपुरी : येथील नगरपरिषदेने तळेगाव हद्दीतील श्री संत सेना महाराज सामाजिक शैक्षणिक समाज विकास संस्थेच्या जागेचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर व मुख्य अधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

इगतपुरी येथील श्री संत सेना महाराज सामाजिक शैक्षणिक समाज विकास संस्थेच्या जागेचे उद्घाटन करताना नगराध्यक्ष संजय इंदुलकर. समवेत मुख्य अधिकारी विजयकुमार मुंडे आदी.
इगतपुरी : येथील नगरपरिषदेने तळेगाव हद्दीतील श्री संत सेना महाराज सामाजिक शैक्षणिक समाज विकास संस्थेच्या जागेचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर व मुख्य अधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
अनेक वर्षांपासून नगरपरिषदेकडे श्री संत सेना (नाभिक) समाजाने एकत्र येऊन वेळोवेळी जागेसाठी पाठपुरावा करत सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्र मासाठी जागा उपलब्ध करून दिली. यावेळी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी मनोगतात व्यक्त केले. तळेगाव महामार्गालगत जागा असल्याने नाभिक समाजाचे विविध सांस्कृतिक-सामाजिक कार्यक्र माबरोबर
शिर्डी येथे जाणारे पायी भाविक विश्रांती थांबा घेतील, असे मत व्यक्त केले.